जालना जिल्हा

शेतकरी व कामगार विरोधी तीन काळे कायदे मागे घेण्यात यावे वाढत्या महागाईला लगाम लावण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे निवेदन


जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील भाजपा सरकारने केलेले कृषी विरोधी तीन काळे कायदे रद्द करावे आणि पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसचे वाढलेले भरमसाठ दर तातबडतोब कमी करावे व तसेच देशात वाढलेली महागाईवर लगाम लावावा आदी मागण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याकडे शुक्रवारी रोजी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि शिष्टमंडळाने दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राज्यभर उपोषण करण्यात आले. या अनुषंगाने जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने एक निवेदन देऊन आपल्या मागण्या प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्याकडे पाठविले आहे.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी निवेदनात सांगीतले आहे की, कृषी विरोधी तीन काळे कायदे हे शेतकरी आणि कामगार विरोधी आहेत. हे काळे कायदे मागे घेण्यात यावे यासाठी देशाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांनी देशभर आवाज उठवून वेळोवेळी आंदोलन उभारले आहे. परंतू केंद्र सरकार हे हिटलरशाही पद्धतीने वागत असल्यामुळे शेतकऱ्यांवर आणि कामगारांवर मोठा अन्याय होत आहे. गेल्या शंभर दिवसांपासून दिल्ली येथे किसान युनियनच्या वतीने आंदोलन सुरू आहे. परंतू केंद्र सरकार याकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसचे दर वाढविल्यामुळे सामान्य माणसाचे जीवन जगने कठिण झाले आहे आणि इंधन दरवाढ झाल्यामुळे महागाईने आकाश गाढले आहे. केंद्र सरकारने सदरील दर ताबडतोब कमी करून सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. देशामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांना नौकऱ्या नसल्यामुळे ते हवालदील झालेले आहे. कोट्यावधी युवक रस्त्यावर आले आहे. परंतू केंद्र सरकार याची साधी दखल घेत नाही हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे श्री देशमुख यांनी निवेदनात सांगीतले आहे. केंद्र सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर श्रीमती सोनिया गांधी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा ईशारा श्री देशमुख यांनी शेवटी दिला आहे.
या निवेदनावर आ. कैलास गोरंट्याल, अभाका. सदस्य भिमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे, विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, विमलताई आगलावे, आनंद लोखंडे, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, चंद्रकांत रत्नपारखे, सोपान सपकाळ, रघुनाथ ताठे, डॉ. विशाल धानुरे, राहुल देशमुख, बदर चाऊस, गुरूमितसिंग सेना, अशोक उबाळे, रामजी शेजुळ, नंदा पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!