जालना तालुका

जालना मंठा महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू.

बबनराव वाघ, उपसंदक

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील रामनगर परीसरातील जालना मंठा महामार्गावर कॉंक्रीट कामासाठी वापरले जाना-या मिक्सर वाहनाच्या जोरदार धडकेने स्कुटर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

रामनगर परीसरातील मंठ्याकडे जाना-या महामार्गावर यशवंती ढाब्याच्या जवळ जालन्याकडुन परतुर जाना-या एम एच 15 सि 7448 स्कुटरचालक शेख बशीर शेख उमर वय 42 वर्ष यास पाठीमागुन येणा-या मिक्सर व्हॅनने जोरदार धडक दिली व शेख बशीर यास स्कुटर सह बराच लांबवर घसडा देत घेवून गेला, यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.हि घटना सायंकाळी साडे पाच वाजे दरम्याण घडली.

मौजपुरी पोलीसांना घटनेची माहीती मिळताच पोहेकॉ मष्जीद, चयनसींग नागलोत, अविनाश मांटे, वाहन चालक बिरादार व महामार्ग पोलीस ए एस आय आर व्ही राऊत, पोनाा तानाजी कान्होरे हे देखील घटनास्थळी पोहचले व मौजपुरी पोलीसांनी खासगी वाहनाने मयतास उत्तरीय तपासनीसाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठवुन दिले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!