घनसावंगी तालुका

हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊस तोडणी शेतकऱ्यांसाठी ठरते फायदेशीर

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

कुंभार पिंपळगाव व परीसरात ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.या भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.सध्या ऊस तोडणीसाठी आधुनिक पद्धत वापरण्याचा प्रघात सुरू आहे.हार्वेस्टर या यंत्राने ऊसतोडणी होत आहे. हा यंत्र ऊस तोडणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. येथे उभा असलेल्या अतिरिक्त ऊसाच्या तोडणीसाठी विविध कारखान्याच्या हार्वेस्टर मशिनने ऊसतोडणी सुरू आहे. यामुळे वेळ व पैशांची बचत होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टर फायदेशीर ठरत आहे.
ऊसाची तोडणी लातूर, रामेश्वर सहकारी साखर कारखाना, समृद्धी शुगर्स लि.इ. कारखान्याच्या हार्वेस्टरच्या मशिनने सुरू आहे.

हार्वेस्टर मशिनने ऊस मुळापासून तोडला जातो. त्यामुळे एकरी उत्पादन वाढते. नुकसानही होत नाही. तोडलेला ऊस कमी वेळेत कारखान्याच्या काट्यावर पोहोचल्याने तो वाळत नाही. त्यामुळे वजन वाढते. ऊस थेट कारखान्याच्या गव्हाणीत पोहोचतो. या यंत्रामुळे ऊसतोडणी मजुरांच्या मागे धावण्याची गरज नाही. ऊसतोड कामगारांना तोडणीसाठी शेतकऱ्याला खूप आर्जव करावे लागतात. प्रसंगी पैसे खर्च होतात आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जी ऊसतोडणी व्हायला एक महिना लागेल ती अवघी चार दिवसांत झाल्याने शेतकरी या कामातून मुक्त होईल. मात्र यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर वाढला, तर ऊसतोड मजुरांच्या रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो.

सुमारे २० एकर क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी महिना लागू शकतो. ऊसतोडणी सलग चालली नाही, तर एकरी सरासरी उत्पादनावर परिणाम होतो. हार्वेस्टर यंत्राने चार दिवसांत माझे क्षेत्र पूर्ण मोकळे होईल आणि उत्पन्न वाढेल.

अशी करावी लागवड

ऊस उभ्या पध्दतीने लावलेला असावा. चार फुटाच्या सऱ्या असाव्यात. लागवड नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यानची अधिक उपयुक्त. पाचट खत म्हणून उपयोगी पडते. ऊस निघून गेल्यानंतर कुट्टीचा एकरी दोन हजार रुपये खर्च वाचतो.

अशी होत असते ऊसतोड

हार्वेस्टर यंत्र वेगाने उसाची तोडणी करते. ऊसाचे तुकडे तयार करून तोडणीवेळी यंत्रासोबत चालणाऱ्या ट्रॉलीत ते टाकले जाते. ट्रॉली भरल्यानंतर मालट्रकमध्ये ऊसाचे तोडलेले टिपरे ओतले जातात. हे सर्व काम आटोमॅटिक चालते. या कामासाठी फक्त चार ते पाच माणसांची गरज असते. यानंतर भरलेला ट्रक थेट कारखान्याच्या काट्यावर जातो. उसतोडीच्या प्रचलित पद्धतीपेक्षा ही हार्वेस्टर पद्धत कमी खर्च, वेळेची बचत होत असते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!