जालना जिल्हा

पहा जालना जिल्ह्यात काय राहणार सुरू;जिल्हाधिकारी यांचे आदेश

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आदेश जारी

न्यूज जालना दि.6

images (60)
images (60)

राज्‍य शासनाने करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक शासनाने कोविड-19 महामारी आपत्तीच्या नियंत्रणासाठी व व्यवस्थापनासाठी दिशानिर्देश निर्गमित केले आहे. सदरील आदेशान्‍वये दिलेले दिशानिर्देश हे दिनांक 30 एप्रिल, 2021 पर्यंत लागू राहतील असे सूचित करण्‍यात आले असल्याने जिल्‍हादंडाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७, फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ अन्‍वये प्राप्‍त अधिकारान्‍वये जालना जिल्‍हयात यापूर्वीचे आदेश अधिक्रमीत करून शासनाच्‍या आदेशाच्‍या अनुषंगाने खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.

१) फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करणे व रात्रीची संचारबंदीः-

i) या आदेशान्‍वये संपुर्ण जालना जिल्‍हयात फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात येत आहे.

ii) त्‍याअन्‍वये सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 रात्री 8 पर्यत 5 किंवा 5 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना सार्वजनीक ठिकाणी एकत्र येण्‍यास / फिरण्‍यास प्रतिबंध राहील.

iii) वरील कालावधी वगळता उर्वरित कालावधीसाठी (म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यतआणि शुक्रवार रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेर्पत) सार्वजनिक ठिकाणीकोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास किंवा खालील नमुद कारणास्तव दिलेल्यापरवानगीशिवाय फिरता / वावरता (संचारबंदी) येणार नाही.

iv) वैद्यकीय व इतर अत्‍यावश्‍यक सेवा यातून वगळण्‍यात येतील. यासाठी होणाऱ्या संचारास प्रतिबंध असणार नाहीत.

v) अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये खालील बाबींचा समावेष असेलः-

i) रुग्‍णालये, रोग निदान केंद्र, दवाखाने, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, औषध‍ निर्मीती उद्योग आणि इतर वैद्यकीय व आरोग्‍य विषयक सेवा.

ii) किराणा, भाजीपाला दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने व फुड शॉप्‍स.

iii) सार्वजनीक वाहतूक – रेल्‍वे, टॅक्‍सी, ऑटो रिक्‍शा, सार्वजनीक बस वाहतूक.

iv) स्‍थानिक प्रशासनाचे मान्‍सून पुर्व कार्ये.

v) स्‍थानिक प्रशासनाचे सर्व सार्वजनीक सेवा.

vi) माल/वस्‍तुंची वाहतूक.

vii) कृषी विषयक सेवा.

viii)ई-कॉमर्स.

ix) अधिकृत मान्‍यताप्राप्‍त मिडीया.

x) स्‍थानिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने घोषीत केलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवा.

xi) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधीत उत्‍पादने.

xii) सर्व कार्गो सेवा.

xiii)डेटा केंद्रे / क्‍लाउड सर्व्हिस प्रोव्‍हायडर्स / पायाभूत सुविधा व सेवेशी संबंधीत आयटी सेवा.

xiv) सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा.

xv) फळ विक्रेते.

2) बाहेरील / सार्वजनीक ठिकाणच्‍या बाबीः-

i) सर्व बागा/उद्याने, सार्वजनीक मैदान दररोज रात्री ८ ते सकाळी ७ व शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.

ii) सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी कोव्हीड -19 बाबत केलेल्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

iii) स्थानिक प्रशासनाने वर नमूद ठिकाणी बारकाईने निरिक्षण केले जात आहे, याची खात्री करावी आणि अशा ठिकाणी गर्दी निर्दशनास आल्यास किंवा अभ्यागताकडून कोव्हीड-19 नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे कोव्हीड-19 विषाणू संसर्गाचा धोका निर्दशनासआल्यास स्थानिक प्रशासनाकडून वरील नमूद सार्वजनिक ठिकाणे तात्काळ बंद केली जातील.

3) दुकाने, बाजारपेठा व मॉलः-

            सर्व दुकाने, बाजारपेठा व मॉल हे अत्‍यावश्यक सेवा वगळता पुर्णपणे बंद राहतील.

i) अत्‍यवाश्‍यक सेवेची दुकाने सुरु ठेवतांना दुकानातील सर्व ग्राहकांमध्‍ये योग्‍य समाजिक अंतर पाळले जाईल, याची दक्षता घ्‍यावी. तसेच जास्‍तीच्‍या ग्राहकांना दुकानाबाहेर उभे राहण्‍यासाठी योग्‍य समाजिक अंतराने जागा चिन्हांकित करतील.

ii) भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सेवा असलेल्या दुकांनाची मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग यांचे लवकारात लवकर लसीकरण करून घेण्यात यावे. सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसे की, पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाईन पेंमेंट इत्यादीचे पालन करण्यात यावे.

iii) या आदेशाने बंद करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचे भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात यावे. तसेच दुकान मालकांने दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षा उपायांचे जसेकी, पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाईन पेंमेंट इत्यादीचे पुर्वतयारी करण्यात यावी. जेणेकरून शासनाकडून कोव्हीड-19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, सदर दुकाने सुरू करण्यात तात्काळ निर्णय घेणे सोईस्कर होईल.

4) सार्वजनीक वाहतूकः-

पुढील प्रतिबंधासह सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍था पूर्णपणे सुरु राहील.

ॲटो रिक्‍शा

चालक + 2 प्रवासी

टॅक्‍सी (चारचाकी)

चालक + परिवहन विभागाने वाहनाच्‍या निश्चित केलेल्‍या आसन क्षमतेच्‍या ५० %

बस

परिवहन विभागाने निश्चित केलेल्‍या पूर्ण क्षमतेच्‍या आसनावर बसलेल्‍या प्रवाश्‍यांना परवानगी राहील. तथापी प्रवाश्‍यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

i) सर्व प्रवाश्‍यांना प्रवासादरम्‍यान योग्‍य पध्‍दतीने मास्‍क परिधान करणे बंधनकारक राहील. याचे उल्‍लंघन केल्‍यास रूपये ५००/- दंड आकारल्‍या जाईल.

ii) चारचाकी टॅक्‍सी वाहनातील कोणतीही व्यक्ती विनामास्‍क आढल्‍यास वाहन चालकास व मास्‍क परिधान न केलेल्‍या व्‍यक्‍तीस प्रत्‍येकी रूपये ५०० दंड आकारल्‍या जाईल.

iii) सर्व वाहनांचे प्रत्‍येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे.

iv) सर्व सार्वजनिक वाहतूक – वाहन चालक आणि इतर कर्मचारी जे लोकांच्‍या संपर्कात येतात यांनी भारत सरकारच्‍या निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घेवून RTPCR निगेटीव्‍ह असल्‍याचे प्रमाणपत्र जवळ बाळगतील. त्‍याची १५ दिवसांपर्यत वैधता असेल. सदरील नियम १० एप्रील पासून अंमलात येईल. टॅक्‍सी व ॲटोरिक्‍शा चालकाने जर प्लास्टिक शिटच्या माध्यमातून स्वत:चे विलगीकरण केल्यास त्याला वरील नियमामधून सूट असेल.

v) वरील प्रमाणे एखादा व्‍यक्‍ती विना आरटीपीसीआर निगेटीव्‍ह प्रमाणपत्र / विना लसीकरण केलेला आढळल्‍यास त्‍यास एक हजार रुपये दंड आकारल्‍या जाईल.

vi) रेल्‍वे प्रशासनाने रेल्‍वेतील सामान्‍य डब्‍यात/बोगीमध्‍ये प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाहीत व सर्व प्रवाशी हे मास्‍क वापरतील याची दक्षता घ्‍यावी.

vii) वरील प्रमाणे रेल्‍वेमध्‍ये मास्‍कचा वापर न करणा-या प्रवाश्‍यास पाचशे रुपये दंड आकारल्‍या जाईल.

viii)आठवडयाच्‍या शेवटी रात्री 8 ते सकाळी 7 दरम्‍यान ट्रेन / बस / विमान या द्वारे येणारे व जाणारे व्‍यक्‍तींना विमानतळ / रेल्‍वे स्‍टेशन / बस स्‍टॅन्‍ड किंवा घरी जाण्‍या-येण्‍यास वैध तिकीटाच्‍या आधारे परवानगी राहील.

5) कार्यालयेः-

i) खालील कार्यालये वगळता सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

i) सहकारी, पब्‍लीक सेक्‍टर युनीट (PSU), खाजगी बॅंक.

ii) BSE / NSE.

iii) विद्युक पुरवठा संबंधीत कार्यालये.

iv) दुरसंचार सेवा पुरवठादार.

v) विमा / वैद्यकीय विमा कार्यालये.

vi) औषधे निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालये जी, उत्पादनाच्या वितरणाशी संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत.

ii) खालील खाजगी संस्‍थांना भारत सरकारच्‍या निकषानुसार कार्यालयात उपस्थित राहणा-या सर्वांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्‍याच्‍या अटीवर आठवडयातील पूर्ण दिवस सकाळी 7 ते रात्री 8 सुरु ठेवण्‍यास परवानगी असेल. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही तो पर्यंत संबंधीत सर्वांचे RTPCR Negative Report सोबत बाळगणे आवश्‍यक राहील. ते 15 दिवसांसाठी वैध राहील. सदरील नियम हे दिनांक 10 एप्रील 2021 पासून लागू राहतील. वरील प्रमाणे प्रमाणपत्र न बाळगणा-या व्‍यक्‍तीस एक हजार रूपये दंड आकारल्‍या जाईल.

a. SEBI व SEBI मान्‍यताप्राप्‍त सेबी आणि सेबीमध्ये नोंदणीकृत स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी आणि क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि मध्यस्थ यासारख्या सेबी आणि सेबीच्या कार्यालयाच्‍या मान्यताप्राप्त बाजार पायाभूत संस्था.

b. RBI द्वारा नियमन केलेल्‍या संस्‍था व मध्‍यस्‍त एकल प्राथमीक विक्रेतेसह, CCIL, NPCI, पेमेंट सीस्‍टीम ऑपरेटर, RBI द्वारा नियमन केलेल्‍या बाजरपेठेत कार्यारत आर्थीक संस्‍था.

c. सर्व बिगर बॅंकींग वित्‍तीय महामंडळे.

d. सर्व सुक्ष्‍म वित्‍तीय संस्‍था.

e. वकिलांची कार्यालये.

f. कस्‍टम हाऊस एजंट, लस/ जीवनरक्षक औषधे/ औषध उत्‍पादने वाहतूक करणारे परवानाधारक मल्‍टीमॉडल ट्रान्‍सपोर्ट ऑपरेटर.

iii) आवश्यकता असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यकतेनूसार एखाद्या कार्यालयास सुट देईल.

iv) सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह कार्यरत राहतील. तथापी विभाग प्रमुखाच्‍या निर्णयाप्रमाणे कोविड-१९ संबंधातील कामकाज असलेले विभाग / कार्यालये हे १०० टक्के उपस्थितीसह सुरु राहतील.

v) वीज, पाणी आणि बँकिंगशी संबंधित सर्व सरकारी कंपन्या व सर्व शासकीय कार्यालये आणि इतर वित्तीय सेवा पुर्ण क्षमतेसह कार्यरत राहतील.

vi) सर्व सरकारी कंपन्‍या व सर्व शासकीय कार्यालयातील बैठका ऑनलाईनद्वारे आयोजीत करावे. केवळ कार्यालय परिसरातील कर्मचा-यांना बैठकीस प्रत्‍यक्ष उपस्थित राहता येईल.

vii) शासकीय कार्यालयात अभ्‍यांगतांना प्रवेश नसेल. आवश्‍यक असेल तर संबंधीत कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास घ्‍यावा लागेल. कार्यालयांना ई-अभ्‍यांगत सेवा सुरु करता येईल.

viii)अपवादात्‍मक परिस्थितीतमध्‍ये अभ्‍यांगतास शासकीय कार्यालयामध्‍ये प्रवेश द्यावयाचा झाल्‍यास त्‍यासाठी कार्यालय प्रमुखाला अभ्‍यागतांचा 48 तासाच्‍या आतील RTPCR Negative Report आधारे पास देता येईल.

ix) भारत सरकारकडील निर्देशानूसार खाजगी आणि सरकारी कार्यालयातील सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता शासनास कार्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.

६) खाजगी वाहतूक व्‍यवस्‍थाः-

खाजगी वाहने तसेच खाजगी बस सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेमध्ये सुरू राहतील आणि अत्यावश्यक सेवा अथवा निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच (सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यत आणि शुक्रवार रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंत) सुरू राहतील.

खाजगी बसेस यांनी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल-

i) खाजगी बसेस मधून बसण्याच्या क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. उभा राहून एकाही प्रवाशाला प्रवास करण्यास परवानगी असणार नाही.

ii) भारत सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानूसार सर्व खाजगी वाहुतक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे आणि लसीकरण पूर्ण होईपर्यत कोरोनाचे RTPCR Negative रिपोर्टचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. ते 15 दिवसांसाठी वैध राहील. सदरचा नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.

7) करमणूक व मनोरंजनः-

i) सिनेमा हॉल बंद राहतील.

ii) नाटयगृहे व प्रेक्षागृहे बंद राहतील.

iii) करमणुक पार्क / आर्केड/ व्हिडिओ गेम पार्लर बंद राहतील.

iv) वॉटर पार्क बंद राहतील.

v) क्‍लब, जलतरण तलाव, जीम आणि क्रिडा संकुल बंद राहतील.

vi) भारत सरकारकडील निर्देशानुसार वरील आस्थापनाशी निगडीत व्यक्ती / कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे. जेणेकरून कोव्हीड-19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास कार्यालये सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.

vii) चित्रपट / मालिका / जाहिरातींचे चित्रिकरण खालील अटींचे अधिन राहुन सुरु राहील.

i) मोठया संख्येने कलाकार एकत्र येतील अशा प्रकारच्या दृश्याचे चित्रिकरण करण्यास प्रतिबंधीत असेल.

ii) सदर कामी व्‍यस्‍त असणा-या कलाकारांसह सर्व कर्मचा-यांना RTPCR Negative Report सोबत बाळगणे आवश्‍यक राहील. ते 15 दिवसापर्यंत वैध राहील. हे नियम दिनांक १० एप्रील 2021 पासून लागू राहतील.

iii) कलाकार आणि संबंधित कामगार वर्ग यांच्यासाठी Quarantine Bubble तयार करण्‍यात आल्‍यास सदर Quarantine Bubble मध्ये प्रवेश करण्यापुर्वी कोरोनाचे RTPCR Negative Report सादर केल्यानंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडूनअटी व शर्तीवर परवानगी देण्यात येईल.

8)रेस्‍टॉरन्‍टस, बार, हॉटेलः-

i) हॉटेलच्या आतील आवारामध्ये असलेले रेस्टॉरंट आणि बार वगळता सर्वरेस्टॉरंट आणि बार बंद राहतील.

ii) सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेमध्ये पार्सल सुविधा/ घरपोच सेवा/Take Away सुविधा या सुरू राहतील. शनिवार व रविवार या दिवशी फक्त घरपोच पार्सल सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यत सुरू राहतील. आणि कोणत्याही नागरिकांस या सेवा घेण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट आणि बार या ठिकाणी जाता येणार नाही.

iii) हॉटेलमध्ये उतरलेल्या प्रवाशांसाठी फक्त हॉटेलमधील रेस्टॉरंट आणि बार सुरू राहतील. कोणत्याही परिस्थितीत बाहेरील प्रवाशांसाठी या सेवेचा लाभ देता येणार नाही. बाहेरील व्‍यक्‍तींसाठी अन्‍य रेस्‍टॉरंट व बारसाठी वरील प्रमाणे असलेले निर्बंध लागू राहतील.

iv) होम डिलेव्हरीशी संबंधीत सर्व कर्मचारी यांचे केंद्र सरकारच्‍या निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्‍यावे. लसीकरण होईपर्यंत RTPCR Negative Report सोबत बाळगणे आवश्‍यक राहील. ते 15 दिवसापर्यंत वैध राहील. हे नियम दिनांक १० एप्रील 2021 पासून लागू राहतील.

v) दिनांक १० एप्रील 2021 नंतर लसीकरण न करता व RTPCR Negative Report सोबत न बाळगता आढळल्‍यास सदर व्‍यक्‍तीस एक हजार रूपये व संबंधीत आस्‍थापनेस दहा हजार रूपये दंड आकरले जाईल. याची पुनरावृत्‍ती झाल्‍यास संबंधीत आस्‍थापनेचा परवाना रद्द करण्‍यात येऊन कोविड-१९ हा साथीचा रोग महामारी म्‍हणून अधिसूचित असेल तोपर्यंत बंद करण्‍यात येईल.

vi) भारत सरकारकडील निर्देशानूसार रेस्टॉरंट आणि बार आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती /कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाची भिती न बाळगता, शासनास रेस्टॉरंट आणि बार सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.

9) धार्मिक / प्रार्थना स्थळे: –

i) सर्वधर्मिय धार्मिक / प्रार्थना स्थळे बंद राहतील.

ii) सर्वधार्मिक आणि प्रार्थना स्थळांमध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतू यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही.

iii) भारत सरकारकडील निर्देशानुसार धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे सेवेकरी यांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणू संसर्गाचीभिती न बाळगता, शासनास धार्मिक / प्रार्थना स्थळे सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.

iv) धार्मिक/प्रार्थना स्थळे सध्‍या जनतेसाठी बंद राहतील. सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळांमध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक आणि धार्मिक सेवा करता येतील. धार्मिक आणि प्रार्थना स्थळांमध्ये आयोजीत होणा-या लग्‍न समारंभ/अत्‍यंविधी संदर्भात शासनाच्‍या वरील संदर्भ क्र. 11 वरील आदेशात नमुद अटींचे पालन करण्‍याचे अधिन राहून परवानगी असेल.

१०) केशकर्तनालय/स्‍पा/सलून/ब्‍युटी पार्लरः-

i) केशकर्तनालय / स्‍पा / सलून / ब्‍युटी पार्लर बंद राहतील.

ii) भारत सरकारकडील निर्देशानूसार सर्व केशकर्तनालय दुकाने/स्पा/सलून/ ब्युटी पार्लरमधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड -19 विषाणूसंसर्गाची भिती न बाळगता, शासनास सर्व केशकर्तनालय दुकाने/स्पा/सलून/ब्युटीपार्लर सुरू करणेबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.

11) वर्तमानपत्र (Newspapers):-

i) वर्तमानपत्रे छपाई व वितरणास परवानगी राहील.

ii) वर्तमानपत्राची होम डिलेव्हरी हे दररोज सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत करता येईल.

iii) या बाबीसाठी व्‍यस्‍त असणा-या कर्मचा-यांचे केंद्र सरकारच्‍या निकषाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्‍यावे. सर्व होम डिलेवरी करणा-या कर्मचा-यांना RTPCR Negative Report सोबत बाळगणे आवश्‍यक राहील. ते 15 दिवसापर्यंत वैध राहील. हे नियम दिनांक 10 एप्रील 2021 पासून लागू राहतील.

12) शाळा व महाविद्यालयेः-

i) सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

ii) वरील नियमामधून 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना सुट असेल. परिक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा 48 तासापर्यंत वैध असलेले कोरोनाचे RTPCR Negative Test Report जवळ बाळगणे आवश्यक राहील.

iii) महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणाकडून आयोजीत होणा-या परिक्षांसंदर्भात राज्‍यातील विद्यार्थ्यासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्थानिक आपत्ती प्राधिकरणास कळवून संबंधीत विभागाच्‍या परवानगीने परिक्षा घेता येतील.

iv) सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील.

v) भारत सरकारकडील निर्देशानूसार वरील नमूद आस्थापनामधील सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पुर्ण करावे, जेणेकरून कोव्हीड-19 विषाणू संसर्गाची भिती नबाळगता, सदर आस्‍थापना सुरू करण्याबाबत निर्णय घेणे सोईस्कर होईल.

vi) आठवडयाच्‍या शेवटी किंवा रात्री 8 नंतर एखाद्या विद्यार्थ्‍याला प्रत्‍यक्ष परिक्षेसाठी परिक्षा केंद्रावर व घरी परत जाण्‍यास प्रवासाची परवानगी असेल तथापी त्‍यासाठी परिक्षेचे वैध हॉल तिकीट (प्रवेश पत्र) सोबत बाळगणे आवश्‍यक राहील.

13) धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम:-

i) कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणी राजकीय कार्यक्रम यांना परवानगी असणार नाही.

ii) ज्या जिल्हयामध्ये निवडणुका प्रस्तावितअसतील, त्या ठिकाणी राजकीय सभा / मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी देण्यात येईल.

i) भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी 50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 टक्के, जे कमी असेल ते आणि खुल्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 टक्के जे कमी असेल ते व त्‍या ठिकाणी सर्व कोव्हीड-19 शिष्टाचाराचे पालन केले जाईल, या अटीवर परवानगी देता येईल.

ii) या ठिकाणी कोविड-१९ योग्य नियमांचे पालन केले जात असल्याची खात्री करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी द्वारा नियुक्‍त अधिकारी पर्यवेक्षकण करतील.

iii) सदर ठिकाणी कोव्हीड-19 शिष्टाचाराचे उल्ल्ंघन झाल्यास संबंधित ठिकाणचा जागामालक ह्यासाठी जबाबदार राहील. आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नूसार दंडास पात्र राहील. गंभीर प्रकारचे उल्ल्ंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड -19 संसर्ग संपेपर्यत बंद राहील.

iv) एखाद्या उमेदवारांच्या दोन पेक्षा जास्त सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झाल्यास पुन्हा सदर उमेदवाराच्या सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही.

v) कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका, कोपरा सभा,इ. ठिकाणी कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

vi) वरीलसर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांसाठी समान राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, याविषयी दक्षता घेणे.

iii) लग्नसमारंभ यांना जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.

i) लग्न समारभांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारकअसेल आणि जोपर्यत लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यत वैध RTPCR Negative Test Report सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

ii) RTPCR Negative Test Report व लसीकरण केलेले नाही असा सेवा देणारा व्यक्तीनिर्दशर्नास आल्यास त्यास रक्कम एक हजार रूपये दंड आकारला जाईल आणि संबंधितआस्थापना मालकास दहा हजार रूपये दंड आकारला जाईल.

iii) लग्नसमारंभ आयोजित केले जात असलेल्या हॉलच्यामध्ये उल्लंघनाची पुनरावृत्‍ती झाल्‍यास सदर परिसर हा सील केला जाईल, तसेच सदर ठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्‍यास दिलेली परवानगी कोव्हीड-19 अधिसचुना संपेपर्यत रद्द केली जाईल.

iv) आठवडयाच्‍या शेवटी (शनिवार व रविवार) आयोजीत होणा-या विवाहसोहळयांच्‍या संदर्भात स्‍थानिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण स्‍थानिक परिस्‍थीतीचा विचार करता संदर्भ क्र.11 वरील शासनाच्‍या निर्देशांच्‍या पालन करण्‍याच्‍या अधिन राहून परवानगी देऊ शकेल.

iv) अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी असेल. सदर अंत्यविधीच्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारीवर्गाचे लवकरात लवकर लसीकरण करावे. सदर कर्मचाऱ्यांस वैध RTPCR Negative Test Report जवळ बाळगणे आवश्यक राहील.

14) रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते:-

i) रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देवू नयेत. फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा दररोज सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत सुरु ठेवता येईल.

ii) प्रतिक्षाधीन ग्राहकांना काऊंटरपासून दूर अंतरावर सामाजिक अंतर राखून उभे करावे.

iii) सदर आदेशाचा भंग करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कोविड महामारी संपूर्ण संपेपर्यंत बंद ठेवण्‍याची कार्यवाही करावी.

iv) ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांनी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत कोविड RTPCR Negative Test Reportसोबत बाळगावे. त्याची मुदत 15 दिवस असेल. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.

v) स्थानिक प्रशासनाने सदर विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे. जे विक्रेते आणि ग्राहक सदर कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील, ते दंडनीय कारवाई पात्र राहतील.

vi) जर विक्रते पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असल्याची स्थानिक प्रशासनाची खात्री झाल्यास व सदर विक्रते दंड करुनही नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर निलंबनाची किंवा साथरोग आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवण्‍याची कारवाई करण्‍यात यावी.

१५) उत्पादन क्षेत्र:-

i) खालील अटीस अधीन राहून उत्पादन क्षेत्र सुरु राहील.

ii) कारखाने व उत्पादक आस्थापना यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तापमान तपासुनच प्रवेशा द्यावा.

iii) सर्व कर्मचारी – व्यवस्थापन व त्याचप्रमाणे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकाराच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे.

iv) जर एखादा कर्मचारी / मजुर सकारात्मक आढळला तर, त्याच्या सोबत निकट संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी/ मजूर यांना पगारी रजा देवून त्यांचे अलगिकरण करण्यात यावे.

v) ज्या कारखान्यात / आस्थापनेत 500 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील अशा कारखान्यांनी/ आस्थापनांनी त्यांचे स्वत:चे अलगिकरण केंद्र स्थापन करावेत.

vi) जर एखादा कर्मचारी सकारात्मक आढळल्यास, सदर युनीटचे संपूर्ण निर्जंतुकीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत युनिट बंद ठेवण्‍यात यावे.

vii) जेवण व चहाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्यात याव्यात. जेणे करुन गर्दी होणार नाही, तसेच एकत्र बसून जेवण करण्‍यास मनाई असेल.

viii)सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे.

ix) सर्व कामगारांचे भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होतनाही तोपर्यंत कोविड RTPCR Negative Test Reportसोबत बाळगावे.ते 15 दिवस वैध असेल. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.

x) जर एखादा कामगार सकारात्मक आल्यास त्याला वैद्यकीय रजा देण्यात यावी व त्याला कामावर गैरहजर कारणास्तव कामावरुन कमी करण्‍यात येऊ नये. सदर कालावधीसाठी सदर कामगारास पूर्ण पगारी वेतन देण्‍यात यावे.

xi) औद्योगीक कामगारांना खाजगी बस/खाजगी वाहनाद्वारे त्‍यांच्या ओळखपत्राच्‍या अधारे प्रवास दररोज आणि आठवडयाच्‍या शेवटी रात्री 8 ते सकाळी 7 त्‍यांच्या कंपनीत जाण्‍या-येण्‍यास परवानगी असेल.

१६) ऑक्सिजन उत्पादन:-

i) सर्वऔद्योगिक आस्थापनांना दिनांक 10 एप्रिल, 2021 नंतर ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. तथापी, योग्य कारणास्ताव त्यांच्या परवाना प्राधिकाऱ्याकडून पुर्वपरवानगी घेवून वापर करता येईल. सर्व परवाना प्राधिकाऱ्यांनी अशा आस्थापनांकडील दिनांक 10 एप्रिल, 2021 नंतर ऑक्सिजनचा वापर थांबवावा किंवा त्याची पुर्व परवानगी घ्यावी.

ii) सर्व ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या उत्पादनापैकी 80 टक्के ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषध निर्माणासाठीच राखीव ठेवणे बंधनकारक राहील. त्यांनी त्यांच्या ग्राहकांची नांवे/तपशीलदिनांक 10 एप्रिल, 2021 पासून प्रसिध्द करावीत.

१७) ई-कॉमर्स:-

i) ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांनी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत कोविड RTPCR Negative Test Report सोबत बाळगावे. ते 15 दिवस वैध असेल.सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.

ii) सदरआदेशाचा पुन्‍हा पुन्‍हा भंग करणाऱ्या आस्थापनांचा परवाना कोविड-19 प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत निलंबीत करण्‍यात येईल.

१८) सहकारी गृहनिर्माण संस्था:-

i) कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्थेत एकावेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृह निर्माणसंस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल.

ii) अशा गृह निर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांना प्रवेश बंदी असल्याबाबतचा फलक लावणे बंधनकारक असेल व अभ्यागतांना प्रवेश बंदी राहील.

iii) सोसायटीमध्ये तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये कोणत्याही नागरिकांचा प्रवेश व बाहेर जाणे याबाबत सोसायटीमार्फत प्रतिबंध करण्‍यात यावा.

iv) जर एखाद्या गृह निर्माण संस्थेने उक्त नमुद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम दहा हजार रुपये दंड करण्यात येईल व दुसऱ्या वेळेस त्यापेक्षा जास्त दंड तेथिल स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरविले प्रमाणे आकारण्‍यात येईल. सदर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेचा वापर हा सोसायटीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कामगारांच्या पगारासाठी करता येईल.

v) सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थानी त्यांच्या संस्थेत वेळोवेळी येणाऱ्या व्यक्तींचे जोपर्यंत लससीकरण होत नाही तोपर्यंत कोविड RTPCR Negative Test शासकीय निर्देशानुसार करावे.

१९) बांधकामविषयकः-

i) ज्या बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधित कर्मचारी/मजूर यांना त्याच ठिकाणी राहण्याची सोय आहे अशा बांधकामास परवानगी असेल. अशा ठिकाणी साधनसामुग्री वाहतूकी व्यतिरिक्त कामगार व इतर वाहतुकीस परवानगी असणार नाही.

ii) ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांनी भारत सरकारच्या निकषानुसारलसीकरण तात्काळ करुन घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत कोविड RTPCR Negative Test रिपोर्ट सोबत बाळगावे. ते १५ दिवसासाठी वैध राहील. सदर नियम 10 एप्रिल, 2021 पासून लागू होईल.

iii) नियमांचे भंग करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांस रक्कम दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लघन झालेस सदर बांधकामाचे ठिकाण हे कोव्हीड-19 माहमारी म्‍हणून अधिसूचित असेपर्यत बंद करण्यात येईल.

iv) एखाद्या कामगार हा कोविड Positive आढळून आल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी. त्याला कामावर गैरहजर कारणास्तव कामावरुन कमी करता येणार नाही. सदर कालावधीसाठी सदर कामगारास पुर्णपगारी वेतन देण्‍यात यावे.

२०) घरगुती मदतनीस / वाहनचालक / स्वयंपाकी यांना रात्री 8 च्या सुमारास आणि / किंवा आठवड्याच्या शेवटी काम करण्यास परवानगी देण्याच्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थानिक परिस्थितीच्या आधारे हे ठरविण्याचा निर्णय घेतील.

२१) दंडनियकारवाई:-

i) शासनाच्‍या दिनांक 27 मार्च, 2021 च्‍या आदेशात नमुद दंड या आदेशात नमुद दंडासह संरेखीत करून लागू राहील.

ii) जमा होणाऱ्या दंडाची रक्कम संबंधीत आपत्ती व्यवस्थान प्राधिकारणाकडे देण्‍यात यावी.सदर दंडाच्या रक्कमेचा वापर कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनासाठी करण्‍यात यावा.

 सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 05 एप्रिल, 2021 चे रात्री 8.00 वाजलेपासून ते दिनांक 30 एप्रिल, 2021 चे रात्री 11.59 बाजेपर्यत लागू राहील.

कूठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उल्‍लंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केली जाईल. त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!