जालना क्राईम

चोरी गेले लाखो रुपयाचे कांदा बियाणे आरोपीसह २४ तासाचे आत केले जेरबंद

न्यूज ब्युरो – जालना शहरातील घोगरे स्टेडीयम समोरील स्वामी समर्थ अर्पाटमेंट पाकिंग गेटचे कुलूप तोडुन शुक्रवारी भल्या पहाटे तीन वाजे सुमारास 22 लाख रुपये किंमती कांद्याचे बियाणे व टाटा कंपनीचा छोटा हत्ती दीड लाख रुपये किंमती असा एकुण 23 लाख 50 हजार रुपयाचा मुद्येमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले होते .

images (60)
images (60)

त्यावरुन पोलीस ठाणे कदिम जालना येथे गुरनं 152/2021 कलम 379 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे . दिनांक 09/04/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , जालना शहरातील घोगरे स्टेडीयम समोरील स्वामी समर्थ अर्पाटमेंट पार्किग मधील चोरी गेलेले कांद्याचे बियाणे व टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सागरसिंग फंट्यांसिग ऊर्फ सुरजसिंग अंधरिले , रा.गुरुगोविंदनगर शिकलकरी मोहल्ला जालना व त्याच्या इतर साथीदार सह केली आहे अशी माहिती मिळाली होती . त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सागरसिंग फंट्यांसिग ऊर्फ सुरजसिंग अंधरिले , रा.गुरुगोविंदनगर शिकलकरी मोहल्ला जालना यास जालना शहरातुन ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर साथीदारसह केल्याची कबुली दिली आहे .

आरोपी नामे सागरसिंग फंट्यांसिग ऊर्फ सुरजसिंग अंधरिले याच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले 22 लाख रुपये किंमती कांद्याचे बियाणे व टाटा कंपनीचा छोटा हत्ती दीड लाख रुपये किंमती असा एकुण 23,50,000 / – रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अपर पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , .सुभाष भुजंग , स्थानिक गुन्हे शाखा जालना , शिवाजी नागवे , सपोनि , पोहेकॉ सॅम्युअल कांबळे , प्रशांत देशमुख , गोकुळसिंग कायटे , विनोद गडधे , सचिन चौधरी , चालक पैठणे यांनी केलेली आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!