कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी विष प्राशन करून संपवली जीवन यात्रा
घनसावंगी :-
घनसांवगी तालुक्यातील आवलगाव येथील शेतकरी विजय प्रल्हाद कोलंगे वय 42 वर्षे यांनी दिनांक 14 रोजी सायंकाळी शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
विजय कोलंगे दिनांक 14 रोजी सायंकाळी शेतात तुषार बदलतो असे सांगून गेले. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचे बंधू त्यांना शेतात पाहण्यासाठी गेले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. विजय कोलंगे यांना अधिक उपचार अर्थ जालना येथे दाखल केले असता आज दिनांक 15 रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. विजय कोलंगे यांच्यावर खाजगी तसेच कुटुंबात बँकेचे कर्ज असल्याने व सतत शेतात नापिकी अतिवृष्टी याबरोबरच आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुलीच्या लग्नाची विवंचना त्यांना स्वतः होत होती. घेतलेले कर्ज कसे फेडावे मुलीचे लग्न व सततची नापिकी या बाबीला कंटाळून विजय कौलगे यांनी हे पाऊल उचलले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. तसेच मृताच्या नातेवाईकास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशीही मागणी केली आहे.