अत्यावश्यक श्रेणीमध्ये ऑप्टीकल दुकानांचा समावेश
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे नविन आदेश जारी
न्यूज जालना, दि. 16
जिल्हादंडाधिकारी तथा
अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 अन्वये प्राप्त अधिकारान्वये जालना जिल्हयात यापूर्वी दि. 14 एप्रिल रोजीच्या आदेशातील नमुद उपाययोजना दि.14 एप्रील 2021 रोजीच्या रात्री 8.00 वाजेपासुन ते दि.01 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00वाजेपर्यंत लागु करण्यात आलेल्या आहेत. या उपाययोजनांमधील मुदा क्र.2 (1) मध्ये या आदेशान्वये आवश्यक श्रेणीमध्ये ऑप्टीकल दुकानांचा समावेश करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी निर्गमित केले आहेत. तसेच यापूर्वीच्या आदेशामध्ये नमूद सर्व बाबी जशाच्या तशा दि.01 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू राहतील.
कुठल्याही व्यक्तीकडुन या आदेशातील सूचनाचे उल्लंघन झाल्यास त्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई केली जाईल, त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.