जालना जिल्हा

जालना- पाथ्रुड बस सुरू करा, अन्यथा आंदोलन

जालना- पाथ्रुड बस सुरू करा, अन्यथा आंदोलन
जालना/प्रतिनिधी
जालना ते पाथ्रुड बस तात्काळ सुरू करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रवाश्यांनी दिला आहे.
याबाबत जालना आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना ते पाथ्रुड ही बस सावंगी तलाव, पाहेगांव, नेर मार्गे जाते. सन 1960 पासून ही बस अविरत सुरू होती. तथापी, नोव्हेंबर 2019 पासून अचानक बंद करण्यात आली आहे.
बस अचानक बंद केल्यामुळे महिला-पुरूष प्रवाश्यांचे अक्षरशः हाल होत आहे. सद्या कोरोना-19 मध्ये मोठ्या दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांना नाहक खाजगी वाहन करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जालना ते पाथ्रुड या बससाठी पाथ्रुडसह सावंगी तलाव, सावंगी तांडा, उखळी, धारा, पाहेगाव, दहिफळ काळे येथील गांवकरी अवलंबून आहे.
तरी जालना आगारप्रमुखांनी येत्या 8 दिवसात जालना ते पाथ्रुड बस सेवा सुरू करावी अन्यथा कोरोना काळात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नितीन जोशी, भागवतकार अमोेल देशमुख, बाळासाहेब देशमुख, दगडुबा गायके, रामचंद्र घेबंड, रंगनाथ गायके, संतोष जोशी, सुमेध देशमुख, सुरेश देमशुख, सौ. कांचन देशमुख, ओंकार देशमुख, रंगनाथ आढे, शिवाजी आडे, ज्ञानदेव घेंबड यांच्यासह पाथ्रुड, सावंगी तलाव येथील प्रवाश्यांची नावे आहेत.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!