जालना जिल्हा

रुग्णालयांनी ऑक्सिजन व फायर ऑडिट करण्याचे सर्व कोविड रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांचे निर्देश

रुग्णालयांनी ऑक्सिजन व फायर ऑडिट करून घ्यावे ऑक्सीजन मॅनेजरची नियुक्ती करावी सर्व कोविड रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जालना दि. 24- कोवीड रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे सद्यस्थितीत ऑक्सीजनच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी रुग्णालयामध्ये आकस्मात आगीच्या घटना घडत आहेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयांनी ऑक्सिजन व फायर ऑडिट करून घेण्याबरोबरच ऑक्सीजन मॅनेजरची नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी एका आदेशाद्वारे दिले आहेत.

images (60)
images (60)

विभागीय आयुक्त यांनी ऑक्सीजनच्या अर्निबध वापर टाळण्यासाठी काही सक्तीच्या सुचना देण्यात आल्या आहे. त्यासाठी अपर जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सीजन ऑडीट समिती जिल्ह्यात गठीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आपल्या रुग्णालयाच्या ऑक्सीजन पुरवठ्याच्या स्थितीबाबत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांचे मार्फत तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच या बाबत दैनंदिनी पाठपुरावा व्हावा यासाठी प्रत्येक रुगणालयामध्ये एक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अधिकाऱ्यामार्फत आपल्या दैनंदिन ऑक्सीजन वापराची अचुक माहिती देणे बंधनकारक आहे. त्यासाठी ऑक्सीजन पुरवठ्याचा अहवाल देण्यात यावा. तसेच आपल्या हॉस्पीटलची ऑक्सीजन गळती तपासण्यासाठी ज्या वेळेस रुग्ण मास्क वापरत नाही त्या वेळेस ऑक्सीजन पुरवठा बंद करण्यासाठी आणि एकंदरीत ऑक्सीजन वापर योग्यरित्या व्हावा यासाठी आपल्या रुग्णालयातील एक जबाबदार व्यक्तीची ऑक्सीजन मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात यावी. ऑक्सीजन मॅनेजर यांनी रुग्णालयातील सर्व ऑक्सीजन पुरवठा तसेच सर्व ऑक्सीजन गळती याबाबत दररोज तपासणी तसेच ऑक्सीजन योग्यरित्या वापर होईल, याची वेळोवळी पाहणी करावी आणि ऑक्सीजन दैनदिन अचूक वापराची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नेमून दिलेल्या नोडल अधिकाऱ्याकडे दयावी. बऱ्याच वेळेस रुग्ण जेवण, शौचालयाकडे गेल्यानंतर किंवा फोनवर बोलताना मास्क काढून ठेवतो परंतू अश्यावेळी ऑक्सीजन पुरवठा चालूच राहतो त्यामुळे ऑक्सीजन गळती होऊ शकते, यासाठी प्रत्येक वार्डातील नर्स यांनी सतर्क राहण्यासाठी सूचना दयाव्यात.

काही रुग्णालयामार्फत अत्यवस्थ रुग्णासाठी HNFC चा वापर केल्याचे दिसून आले आहे. अत्यंत बिकट परिस्थिती HNFC चा वापर करावा आणि अगामी काळात टप्याटप्याने HNFC वापर कमी होईल यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरुन ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात वापर होणार नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व कोवीड रुग्णालयांची तपासणी केली असता काही रुग्णालयांनी फायर ऑडीट केले नसल्याचे दिसून आले आहे. आपल्या रुग्णालयाचे फायर ऑडीट येत्या आठ दिवसात पुर्ण करुन तसा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास व मुख्याधिकारी, नगर परिषद जालना यांचेकडे सादर करावा.

तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आग प्रतिरोधक यंत्र वापरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. मराठवाड्यात वीज पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात, त्याबाबत प्रत्येक रुग्णालयाने त्यांच्या इमारतीवर वीज अटकाव यंत्रणा उभी करावी. ही सर्व कार्यवाही करुन आपल्या रुग्णालयाचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!