घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगावात सकाळी गर्दी, दुपारनंतर शुकशुकाट
येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते.परंतु जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लादले.त्यामुळे या रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळाला.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगावात खरेदीसाठी बाजारपेठेत सकाळी अकरा वाजेपर्यंत ग्राहक गर्दी करतात.व दुपारनंतर शुकशुकाट दिसून येतो.जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी कडक निर्बंध लावले आहेत.
सकाळी अकरा वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, फळे खरेदीसाठी सुट असल्याने सकाळी बाजारपेठ नागरीकांनी गजबजलेला असतो.त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडत असतात.सकाळी खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात.दरम्यान दुपारनंतर मात्र बाजारपेठेतील रस्ते निर्मनुष्य असतात.पोलिसांची सातत्याने दिवसभर गस्त सुरूच असते.