जालना क्राईम

एमआयएम चा वाढता प्रभाव व सामाजिक कार्याची कॉंग्रेस आमदार ने घेतली धास्ति:-ज़ोहेब अंसारी युवा शहर अध्यक्ष

जालना / प्रतिनिधी

images (60)
images (60)

जालना शहरात तसेच जिल्ह्यात एम आय एम पक्ष हा जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या नेतृत्वाखाली दिवसं दिवस वाढत ज़ात आहे, जिल्हाध्यक्ष शेख माजेद व पक्षाचे पदाधिकारी हे कोरोना च्या काळात सर्व सामान्य जनतेच्या मदति साठी स्वतः जाऊन अहोरात्र काम करतांना दिसत आहेत, शहरा सह जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी प्रत्येक तालुक्यात पक्षाची मज़बूत बांधनी केली आहे,
मागच्या तीन आठवड्या पासून आपल्या क्षमते नुसार शहरात जिल्हाध्यक्ष शेख माजेद हे एमआयएम पक्षा तर्फे आपल्या स्वतःच्या स्व खर्चातुन व स्वतः गोरग़रीब जनतेसाठी हातावर पोट असणाऱ्यां साठी अन्न व पानी वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवत आहेत, गरज़ू लोकांच्या मदति साठी, पीडितांच्या मदति साठी एमआयएम पक्ष हा सतत काम करत आहे, याची दखल घेत सामान्य जनता ही प्रतिसाद देत आहे,
जिल्ह्यात कोरोना चा कहर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्या साठी जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी जिल्ह्यातील आमदार व खासदार यांनी जनते च्या मदति साठी पुढे यावे असे अव्हान केले होते, झपाट्याने या बतमीची जिल्ह्यात प्रसिद्धि झाली व शहराचे आमदार खड़बडून जागे झाले व आपल्या निधितुन 1 कोटि रुपये मोठ्या उद्योगपतींच्या कोविड सेंटर ला दिले. खर म्हणजे तर आमदार साहेब गोरग़रीब जनतेसाठी रस्त्यावर येऊन कहीही एक मदत केलेली नाही, घरात बसून आपल्या कार्यकर्ताना आदेश देत होते, ज्या समाजा मुळे, ज्या गोरग़रीब जनते ने मुळे हे आमदार झालेत त्यांना वार्यावर सोडून दिले, जनते ने यांना आमदार केले नगराध्यक्ष बनवले त्यांचे ऋण फेडण्या ऐवजी आपला संपर्क कार्यालय बंद करुण फक्त मोठ्या उद्योगपतिंसाठी च काम करतांना दिसून येत आहे, आपल्या स्व ख़र्चातुन काहीही एक सामाजिक काम करतांना ते दिसले सुद्धा नाही, सामान्य जनतेने निवडून दिलेल्या आमदाराने हाता वर पोट असणाऱ्यां गोरग़रीब जनतेसाठी सुद्धा काही कार्य करावे अशि अपेक्षा शेख माजेद यांनी केली होती, परंतु त्यांना हे पटले नाही व आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून काही तरी टिका टिप्पणी करुण समाजात कशी फुट पाडावी व आपला ध्येय कसा साध्य करायचा हे त्यांना माहित आहे, परतुं जनता जनार्दन ही चांगलीच समझदार झालेली आहे, त्यांच्या या भुलथापाला बळी पडणार नाही, व समाजात एकोपा कायम ठेवणार, एमआयएम पक्ष ज़री छोटा असला तरी तो राज्यकर्त्यांना आपले कर्त्तव्य आठवल्या शिवाय राहत नाही, एमआयएम पक्ष हा राजकरण करत नाही तो फक्त समाजकारण करत आहे. असे एम आय एम चे युवा शहर अध्यक्ष ज़ोहेब अंसारी यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!