पहिल्याच दिवशीं गुंज गावात ११० जणांचे लसीकरण
डोस उपलब्ध होताच गुंज येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात
प्रतिनिधी/ घनसावंगी
घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळेमध्ये लसीकरणास प्रारंभ झाला असून ग्रामस्थांनी लस टोचून घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसुन येत आहे.
गुंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी १० वाजता लसीकरणास प्रारंभ झाला.
तसेच यावेळी गावचे सरपंच उमेश काजळे,माजी सरपंच भीमाशंकर धनवडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जालिंदर काजळे,एम.पी.डब्ल्यू नाटेकर सर,सुपरवायझर राठोडकर , सिस्टर ए.एन.एम वंदना मॅडम, आशा कार्यकर्ते मैनाताई राऊत, ज्योती राऊत, छाया शिंदे, तसेच केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्र.मुख्याध्यापक दिगंबर मोरे सर,सहकारी शिक्षक दगडुबा सुरनर आणि ज्ञानेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती.
आरोग्य केंद्रावर सकाळपासून 45 वयोगटाच्या पुढच्या नागरिकांना आणि महिलांना लस देण्यात आली.तरी गुंज येथील आरोग्य विभागाकडून या अगोदर मागच्या शुक्रवारी काही ग्रामस्थांना लस देण्यात आली होती. गावचे माजी सरपंच भीमाशंकर धनवडे यांना लस टोचून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.गावातील ग्रामस्थांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी महिला आणि पुरुष मिळून ११० ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.