प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून माहेरच्या लोकांनी पतीसह तिघांना जिवे मारन्याचा केला प्रयत्न.
बबनराव वाघ, उपसंपादक
जालना तालुक्यातील मौजपुरी शिवारातील गट क्रंमाक 163 मधील शेतात राहणारे ज्ञानेश्वर चांदगुडे यांच्या एका मुलीसोबत प्रेम विवाह केल्याचा राग धरुण तलवारीचे वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने सुमिञा जनार्धन चांदगुडे यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे मुलाने आरोपीच्या बहिणीसोबत प्रेम विवाह केला याचा राग मनात धरुन , नमुद आरोपीतांनी मा जिल्हाधिकारी कोरोना संदर्भाने आदेशाचे उल्लघंन करुन , गैरकायद्याची मंडळी जमवुन , हातात तलवारी घेऊन नमुद आरोपीतांनी फिर्यादीचा मुलगा ज्ञानेश्वर याचे डोक्यात पायावर व हातावर जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार केले व फिर्यादीचा भाचा सचिन हा सोडविण्यास आला असता जिवे मारण्याच्या उद्देशाने पोटात तलवार खुपसुन गंभीर जखमी केले व फिर्यादीचा लहान मुलगा रामेश्वर हा मध्ये सोडविण्यास आला असता त्याचे डोक्यात तलवारीने वार केले व फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या व फिर्यादीची सुन हिस पळवुन नेले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अद्याप ताब्यात घेतले नसल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.