घनसावंगी तालुका

18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला शुभारंभ

जालना दि . 1 ( न्यूज जालना) : – आज दि . 1 मे रोजी जालना जिल्ह्यामध्ये 18 ते 44 वयोगटासाठी पाच लसीकरण केंद्राची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली . त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय अंबड , ग्रामीण रुग्णालय भोकरदन , ग्रामीण रुग्णालय परतुर , ग्रामीण रुग्णालय घनसावंगी , शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र पानवेस या पाच केंद्राचा समावेश आहे . या ठिकाणी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच नोंदणी झालेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात आले लसीकरण मोहिमेची सुरुवात दुपारी 2 .00 वाजता ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथे राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या शुभहस्ते करण्यात आली . याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अर्चना भोसले , जिल्हा आरोग्य 7 अधिकारी डॉ . विवेक खतगावकर , जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ . संतोष कडले , वैद्यकीय अधिक्षक डॉ.दोडके , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगावकर आदी उपस्थित होते .

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!