जालना जिल्हा

जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे ग्रामपंचायतनिहाय सुक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे निर्देश

जालना, दि. 11 (न्यूज जालना) :- जालना जिल्ह्यामध्ये वृक्षांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढावे यादृष्टीकोनातुन वृक्ष लागवडीचे ग्रामपंचायतनिहाय सुक्ष्म नियोजन करुन आराखडे तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

images (60)
images (60)

वृक्ष लागवड मोहिम राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, सहाय्यक वनसंरक्षक वन विभाग पी.पी.पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री मोहिते जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर विकास शाखा श्री. सुर्यवंशी सहा.गट विकास अधिकारी जि.प.जालना श्री.सिरसाट, वरिष्ट सहाय्यक श्री.जाधव, कार्यक्रम व्यवस्थापक एस.आर.देवढे, अध्यक्ष, रोटरी क्लॅब ऑफ जालना रेन्बो श्रीमती स्मिता भक्कड, डॉ.हयातकर, श्री.पठाडे यांच्यासह रोटरी क्लॅब ऑफ जालना रेन्बो सदस्य अशासकीय संस्थेचे सदस्य आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, 05 जुन 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन मोहिम स्वरुपात जालना जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका व शहरी भागात वृक्ष लागवड कार्याक्रमाचा शुभारंभ करण्यात यावा. रोपांच्या उपलब्धेबाबत वन विभाग व सामाजिक वनीकरण यांनी नियोजन करुन आवश्यकते प्रमाणे रोपे उपलब्ध करुन द्यावीत.

वृक्षलागवडीचे काम येत्या पावसळयात करावयाचे असल्यामुळे गावातील, शहरातील प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध असलेल्या मोकळया जागेत, शेतामध्ये, बांधावर, पडीक जमिनीवर, रस्ता दुतर्फा, कॅनॉल दुतर्फा, नदी व नाले यांच्या काठावर वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेवुन गावातील व शहरातील प्रत्येक व्यक्तीमागे किमान 3 झाडे लावण्याकरिता नियेाजनबध्द पध्दतीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!