जुना जालना भागात निराधाराच्या खात्यावर दलालाचा डल्ला ,गुन्हा दाखल
न्यूज जालना
एका निराधाराच्या खात्यावरून रक्कम हडप करणाऱ्या दलालास पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना जालना भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून एका निराधार महिलेची रक्कम हडप करताना या दलालाला बँकेच्या शिपायाने पाहिले होते.
याबाबत सविस्तर असे की, शुक्रवार (ता.७) रोजी नियमितपणे बँकेचे कामकाज सुरू असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक वृद्ध महिला पैसे काढण्यासाठी खजिनदाराच्या खिडकीजवळ गेली. यावेळी काम करत असलेल्या महिला कर्मचारी आदीलक्ष्मी यांनी महिलेकडील पासबुक घेतले आणि या महिलेला नाव विचारले.
पासबुकवर शशिकला भिमराव भिगी हे नाव होते. मात्र या महिलेने तिचे नाव चंद्रभागा ठोकळ असे सांगितले. दोन्ही नावमधील तफावत बँक अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यामुळे आपले बिंग फुटले.
हे लक्षात येताच या वृद्ध महिलेच्या बाजूला उभा असलेला दलाल पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात बँकेचे शिपाई पुरुषोत्तम भाले यांनी या दलालाला पकडले. यावेळी या दोघांमध्ये झटापटही झाली परंतु उपस्थित ग्राहकांच्या मदतीने या दलाला पकडण्यात कर्मचाऱ्याला यश आले.