भोकरदन तालुका

लिंगेवाडी ग्रामपंचायतने पाण्याची वसुली थांबविण्याची ग्राम पंचायत सदस्य यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी

पाणी पुरवठ्याची अवैध वसुली थांबवून चौकशी करण्याची मागणी

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

सध्या सर्वत्र कोरोना महामारी ने हाहाकार माजवला असल्यामुळे हातावर काम करणारे व शेतकरी बांधव अंत्यत त्रस्त असताना लिगेवाडी येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून पाणीपुरवठाच्या नावावर गावकऱ्यांकडून अवैध वसुली सुरू असलेली तात्काळ थांबवून संबंधित ग्रामसेवक व सरपंच याची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्या शकुंतलाबाई बबनराव शिंदे यांनी केली.

लिगेवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी 2018 -2019 मध्ये जुईधरण येथून पाणी पुरवठा योजनेतून गावासाठी नवीन पाईपलाईन करण्यात येऊन 2019 -2020 यावर्षी सदरील योजना पूर्ण करण्यात येऊन पाणी पुरवठा सुरू करण्यात येऊन या योजनेतून अद्याप पर्यंत गावकऱ्यांना नवीन नलकनेशन देण्यात आलेले नसून गावात उभारण्यात आलेल्या टाकीतून संपूर्ण गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे सदरली टाकीसमोर पाणी भरण्यासाठी गावातील नागरिक मोठया संख्येने गर्दी होते .त्यामुळे गावात कोरोना आजार देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी पुरवठा करण्याचा नावाखाली गावातील प्रत्येक व्यक्ती कडून महिन्याला 25 रुपये कोणतीही पावती न देता अवैध वसुली केली जात आहे ही वसुली तात्काळ थांबवून या सदरील गैरव्यवहाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत याच्याकडे माजी सैनिक तालुकाअध्यक्ष बबन शिंदे , सुनील पाटील ,गजानन शिंदे,दीपक साबळे , बबन खैत्रे ,पंडित लोखंडे , गजानन घोडे ,संदीप साबळे , अर्जुन देवरे , हनुमंत शिंदे यांच्यासह गावकर्यांचा निवेदनावर सह्या आहे…

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!