प्रल्हादपुरात मकाच्या शेतात गांजाची लागवड;२१ किलो गांजासह शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
भोकदरन पोलिसांची कारवाई
न्यूज जालना/प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील प्रल्हादपूर शिवारातील दगडू धोंडू खेकाळे (वय 52) यांच्या शेतातील मकाच्या पिकामध्ये आणि बांधावर गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याआधारे भोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, भोकरदनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी संयुक्तरित्या या शेतावर आज दुपारी धाड टाकली.
यावेळी मकाच्या पिकामध्ये आणि बांधावर २१ किलो गांजा, सुमारे सव्वालाख रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी बहुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, शेख आसेफ, पोलीस कर्मचारी रामेश्वर सीनकर, अरुण वाघ, अभिजीत वायकोस, समाधान जगताप, गणेश निकम, गणपत बनसोड, निलेश भुसे आदींनी पार पाडली आहे.
या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.