जालना जिल्ह्यात एकाच दिवशी 8 हजार 9 व्यक्तींच्या अँटीजेन चाचणी
जालना दि.21(न्यूज जालना) :- जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिल्याने जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, पोलीस महसुल व जिल्हा परिषदेमधील सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले असुन दि. 21 मे 2021 रोजी करण्यात आलेल्या अँटीजेन तपासणीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
सामान्य रुग्णालय जालना येथे एकुण 6 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये एकही जण अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही.जालना शहरात एकुण 1 हजार 611 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 4 पॉझिटिव्ह व 1 हजार 607 निगेटिव्ह आले आहेत. जालना ग्रामीण येथे एकुण 273 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 11 पॉझिटिव्ह व 262 निगेटिव्ह आले आहेत. बदनापुर येथे एकुण 650 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 9 पॉझिटिव्ह व 641 निगेटिव्ह आले आहेत. अंबड येथे एकुण 645 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 30 पॉझिटिव्ह व 615 निगेटिव्ह आले आहेत. घनसावंगी येथे एकुण 762 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 11 पॉझिटिव्ह व 751 निगेटिव्हआले आहेत. भोकरदन येथे एकुण 955 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 36 पॉझिटिव्ह व 919 निगेटिव्ह आले आहेत. जाफ्राबाद येथे एकुण 1 हजार 147 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 11 पॉझिटिव्ह व 1 हजार 136 निगेटिव्ह आले आहेत.परतुर येथे एकुण 900 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 35 पॉझिटिव्ह व 865 निगेटिव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, जालना येथे एकुण 1 हजार 200 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 10 पॉझिटिव्ह व 1 हजार 190 निगेटिव्ह आले आहेत. अशा प्रकारे एकुण जिल्ह्यात दि. 21 मे 2021 रोजी 8 हजार 166 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 157 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 8 हजार 9 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या तपासणी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वत:साठी व कुटुंबियांसाठी कोरोना संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ॲटिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.