दारू विक्री सर्रासपणे सुरू : तळीरामांकडून गोरगरिबांची कुचंबना पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष : सरपंच अशोक तौर
घनसावंगी प्रतिनिधी : नितिन राजे तौर
गोदाकाठ परिसराला आता अवैध धंद्याचे माहेर घरच मानले जात आहे तर त्यात वाळु माफियांच्या धुमाकूळासोबत आता अवैधरित्या सर्रासपणे दारूची विक्री केली जात आहे.
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव सह परिसरात अवैधरित्या दारू विक्री केली जात असुन विनापरवाना भर रस्त्यावर दारूची विक्री केली जात आहे याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असुन सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होत आहे.
खेड्यातील गोरगरिबांना गावातील तळीरामांकडून घरात शिरून महिलांना शिविगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत तर याकरिता ग्रामस्थांनी व स्वतः महिलांनी देखील नावासहित तक्रारी दिल्या आहेत तर अनेक वेळा दारूबंदीसाठी आंदोलन,मोर्चे काढले मात्र पोलीस प्रशासनाकडून यावर कुठलीही ठोस कार्यवाही झाल्याचे अद्याप दिसले नाही तर यामुळेच सदर दारू विक्रेत्या सोबत तळीरामांना देखील अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे याकडे जर असेच दुर्लक्ष होत राहिले तर शिवनगाव येथील महिला प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बचत गटाच्या महिलांनी सांगितले.
(प्रतिक्रिया)
अशोक तौर…..(सरपंच शिवनगाव)
गावातील गोरगरिबांना तळीरामांकडून शिवीगाळ करत त्रास दिला जात आहे,यामुळे सर्वसामान्य जनतेची कुचंबना होत असल्याने याबाबत मी अनेकवेळा दारू विक्री व तळीरामांच्या विरोधात पोलीस प्रशासनाला कळवले मात्र याविषयी पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे तसेच अनेक वेळा पीडितांनी तक्रार केल्यास कुठलीही कार्यवाही होत नाही यामुळे आता आम्ही हतबल झालो आहोत जर पुढील काळात काही चुकीचा प्रकार घडल्यास आम्ही कायदा हातात घ्यायचा का?…. मात्र यास पोलिस प्रशासन जबाबदार राहील……