भोकरदन तालुका

कोरोनाच्या संकटात जैन संघटना आली धावून, भोकरदन तालुक्यात ऑक्सीजन बैंक चे उदघाटन

ही मशीन हवेतुन ऑक्सिजन निर्मित करते व २० लीटर याची क्षमाता आहे

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

गतवर्षी आलेल्या कोरोना संकटानंतर देशभरात भीतीचे वातावरण होते.आशा या संकटात नागरिकांच्या मदतीला भारतीय जैन संघटना धावून आली पहिल्या टप्यात मोबइल व्हॅन च्या माध्यमातून घरोघरी जावून रुग्णांची तपासणी,रक्तदान शिबिर,मिशन झिरो,कोविड सेंटर,प्लाजमा डोनर्स योजना,तर अगदी आता ऑक्सिजन पुरवीण्यापर्यंतचे काम, याच पार्श्वभूमिवर जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा यांच्या प्रेरणेणे ,राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनखाली भोकरदन तालुक्यात प्रथमच मिशन राहत योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन काँन्संट्रेटर मशीन चे उदघाटन करण्यात आले.

भोकरदन शहरात ऑक्सिजन चा तुटवडा होत असल्याने येथील शशिभूषण चौधरी यांचे वडील कमलाकर चौधरी यांना ऑक्सिजन मशीन ची आवश्यकता होती यावेळी भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष मयुर बाकलीवाल यांनी जालना येथे संपर्क करुण त्यांना नाममात्र डिपॉजिटवर निशुल्क ऑक्सिजन मशीन काही दिवसासाठी उपलब्ध करुण दिली,जैन संघटनेच्या माध्यमातून भोकरदन तालुक्यात नेहमी असे उपक्रम हाती घेतले जातात व पुढेही घेण्यात येईल असे बोलताना मयुर बाकलीवाल यांनी सांगितले तर ही मशीन हवेतुन ऑक्सिजन निर्मित करते व २० लीटर याची क्षमाता आहे असे जैन संघटनेचे जिल्हा प्रतिनिधि व नगरसेवक संतोष अन्नदाते यांनी सांगितले यावेळी,प्रवीण मोहता,सचिन जाधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!