घनसावंगी तालुक्यातील बहुतांश गावात ग्राम दक्षता समिती कागदावरच!
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
राज्यात कोरोचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाचा प्रतिबंधक रोखण्यासाठी गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.मात्र या आदेशाला घनसावंगी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीने तिलांजली दिली आहे.फक्त कागदोपत्रीच दक्षता असल्याचे चित्र दिसत आहे.गावात दक्षता नसल्याने ग्रामीण भागात कोरोना घराघरांत पसरलेला आहे.कोरोनाला गावाबाहेर रोखण्यासाठी ग्राम दक्षता समितींची स्थापना करण्यात आली आहे.या समितीत सरपंचासह सुज्ञ नागरीकांचा समावेश करण्यात आला आहे.
एखादा कोरोना बाधित रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक फिरत असल्यास त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे करडी नजर नसल्यामुळे ग्रामीण भागात रूग्ण संख्या वाढत आहे.ग्रामीण भागात सुरक्षित अंतर राखणे,मास्क न वापरणे इ. नियमांचे पालन होत नाही.ही गंभीर बाब आहे.कोरोना संसर्ग आटोक्यात यावा म्हणून स्थापन झालेल्या समित्या फक्त कागदोपत्रीच असल्याचे चित्र दिसून येते.यातून स्थानिक प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाला हरताळ फासले जात आहे.