घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव परीसरात पाऊस
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परीसरात राजाटाकळी,गुंज,भादली,राजूरकरकोठा,मूर्ती, जांब समर्थ विरेगाव तांडा, जांब समर्थ तांडा, भेंडाळा, आदी गावांमध्ये दुपारी चार वाजेच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडला.आज सकाळपासूनच आकाशात ढगाळमय वातावरण निर्माण झाले होते.जवळपास सुमारे तासभर पाऊस पडला. त्यानंतर रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती.यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.