भाजयुमो कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबीत करा : माजी मंत्री लोणीकर
आक्रमक पवित्रा घेण्याचा ईशारा :
घनसावंगी प्रतिनिधी : नितिन राजे तौर….
जालना जिल्ह्यातील शिवराज नारीयलवाले या भाजयुमो पदाधिकार्याला व्हिडीओ चित्रीकरण करतांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत महिला , तरुण , संत , महंत यांच्यासह अनेकांना अमानुष मारहाण झाली आहे . हे सरकार महाराष्ट्राचा सरकार आहे की रजाकारी प्रवृत्तीच सरकार आहे हाच खरा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे परंतु त्याच्यावर कारवाई केली नाही परंतु भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी याने एखाद्या चुकीच्या बाबी विरोधात आवाज उठवला म्हणून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पहिलवान नारियलवाले या युवकाला अमानुष मारहाण केली आहे या अमानुष मारहाणीचा आम्ही निषेध करतो आहोत यापूवीदेखील परतूर येथे गोविंद मोर नामक प्रतिष्ठित व्यापायाच्या घरी गुटका असल्याच्या संशया खाली पोलिसांनी धाड टाकली होती त्यात त्यांना काहीही सापडले नाही परंतु त्या व्यापार्याची प्रतिष्ठा मात्र धुळीस मिळाली होती . पोलीस महानिरीक्षक , पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या युवकाला मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांना निलंबित करावे अशी आमची मागणी आहे . भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पैलवान नारियलवाले आपल्या बहिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले असताना तेथे उपस्थित असणारे पोलीस यांनी दर्शन देवावाले या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक एकत्र आले त्या नातेवाईकांना हे पोलीस शिवीगाळ करत होते या अन्यायाला वाचा फोडावी या उद्देशाने नारियलवाले यांनी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला त्याचा राग मनात धरून उपस्थित सर्व पोलिसांनी मिळून संबंधित युवकाला अमानुष मारहाण केली आहे या अमानुष मारहाणीचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत असून या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसणाऱ्या सर्व पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना मदतीचा खूप मोठा ओघ सुरु ठेवला होता . काही दिवसांपुर्वीच शिवराज नारीयलवाले यांनी देखील जालना शहरात पुढाकार घेत 100 युवकांचे रक्तदान शिबीर घेउन सामाजिक बांधीलकी जोपासली होती . युवा मोर्चा पदाधिकारी व कायम संयमी आणि समाजहिताची कामे हाती घेतात परंतु अशा युवकांना विरोधात अगदी क्षुल्लक कारणावरून एवढी अमानुष मारहाण होत असेल तर ही प्रशासनासाठी अत्यंत गंभीर बाब आहे या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांवर पोलीस महानिरीक्षक , जालना पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही करावी . असे न झाल्यास भाजपा व युवामोर्चाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला जाईल व त्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.