जालना क्राईम

जालन्यातील भाजपा कार्यकर्ता मारहाणप्रकरणी पाच पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांची कारवाई.

न्यूज जालना – newsjalna

images (60)
images (60)

भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियालवले यांना काठी तुटे पर्यंत मारहाण करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले यातच भाजप चे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तात्काळ दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली दरम्यान काही तास उलटत नाही तर जालना जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी एक फौजदार सह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांत पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम , पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे , नंदकिशोर ढाकणे , सुमित सोळंके , महेंद्र भारसाकळे यांचा समावेश असून पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर येत्या दोन दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .

व्हायरल झालेला विडिओ पहा

जालना येथील भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियालवाले यांना 9 एप्रिल रोजी शिवीगाळ करतांनाच चित्रीकरण केलं म्हणून लाचखोर पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर , पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व अन्य पोलीस कर्मचारयांनी काठ्या तुटे पर्यंत बेदम मारहाण केल्याचा तक्रार करण्यात आली व 27 मे रोजी मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असता माजी मुख्यमंत्री फडणवीस , चित्रा वाघ व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी कारवाईची मागणी केली दरम्यान 28 ने रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी मारहाण प्रकरणी सहा जणांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!