घनसावंगी तालुका

विरेगाव तांडा येथील रस्त्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांना दुतर्फा नाल्यांची प्रतिक्षा

images (60)
images (60)

प्रशासनाचे दुर्लक्ष: अनेक घरात पावसाळ्यात साचते पाणी

कुंभार पिंपळगाव/ कुलदीप पवार

पाचोड ते पाथरी हा राज्य महामार्ग पाचोड, अंबड, घनसावंगी, म. चिंचोली, कुंभार पिंपळगाव, आष्टी मार्गे पाथरी असा आहे.हा रस्ता विरेगव्हाण तांडा येथून गेलेला आहे.परंतू विरेगव्हाण तांडा येथील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही नाली बांधण्यात आलेली नाही.परीणामी पावसाळ्यात रस्त्यालगत असलेल्या घरात पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण होते.येथील वळण रस्त्यावर नाली होणार कधी? असा प्रश्र्न रस्त्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांना पडलेला आहे.

परीणामी येथील वळण रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये,दुकानांमध्ये पावसाळ्यात पाणी घुसते.तर साचलेल्या या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.येथील नाल्यांसाठी प्रशासकडे वारंवार मागणी करून प्रशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात आहे.

पाचोड-पाथरी महामार्गावर विरेगाव तांडा येथे दुतर्फा नाल्या बांधण्यात आल्या नाही.आम्ही या रस्त्यालगत राहत असल्यामुळे पावसाळ्यात घरात पाणी साचून दुर्गंधी पसरते.याचा मोठा त्रास सहन करून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो.वरीष्ठ प्रशासनासह, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून येथील नाल्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल’.

गोरख पवार
ग्रामस्थ, विरेगव्हाण तांडा

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!