जालना जिल्ह्यात 31 मे रोजी 4 हजार 14 व्यक्तींच्या केल्या अँटीजेन चाचणी
जालना दि. 31 :- जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले असुन दि. 31 मे 2021 रोजी करण्यात आलेल्या अँटीजेन तपासणीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
सामान्य रुग्णालय जालना येथे एकुण 7 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 7 निगेटिव्ह आले आहेत.जालना शहरात एकुण 687 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 2 पॉझिटिव्ह व 685 निगेटिव्ह आले आहेत. जालना ग्रामीण येथे एकुण 387 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 387 निगेटिव्ह आले आहेत. बदनापुर येथे एकुण 433 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 433 निगेटिव्ह आले आहेत. अंबड येथे एकुण 590 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 8 पॉझिटिव्ह व 582 निगेटिव्ह आले आहेत. घनसावंगी येथे एकुण 293 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 9 पॉझिटिव्ह व 284 निगेटिव्हआले आहेत. भोकरदन येथे एकुण 890तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 4 पॉझिटिव्ह व 886 निगेटिव्ह आले आहेत. जाफ्राबाद येथे एकुण 351 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 351 निगेटिव्ह आले आहेत.परतुर येथे एकुण 22 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 22 निगेटिव्ह आले आहेत. मंठा येथे एकुण 334 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह व 333 निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय जालना यैथे एकुण 20 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटव्ह 19 निगेटिव्ह आले आहेत.. अशा प्रकारे जिल्ह्यात एकुण दि. 31 मे 2021 रोजी 4 हजार 14 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 25 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 3 हजार 989 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या तपासणी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वत:साठी व कुटुंबियांसाठी कोरोना संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ॲटिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.