जालना जिल्हा

रक्तदान करून नवरदेव चढला बोहल्यावर

जालना/प्रतिनिधी
कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता एका तरुणाने लग्नानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात स्वत: रक्तदान केल्यानंतर नवरदेव तरुण बोहल्यावर चढला. जनकल्याण रक्तपेढच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

images (60)
images (60)

कोरोना काळात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, लस घेतलेल्या अनेकांना २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे शिबिरांची संख्याही घटली आहे. हे लक्षात घेता औरंगाबाद येथील राज हिंगे या तरुणाने येथील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने पाथरी येथे विवाहापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या ठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन करून ३० दात्यांनी रक्तदान केले. नवरेदव राज यानेही बोहल्यावर चढण्यापूर्वी रक्तदान करून एक नवा पायंड पाडला. जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवाज जाधव यांनी या शिबिरासाठी प्रयत्न केले. यावेळी नवदांपत्याला रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छ देण्यात आल्या.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!