घनसावंगी तालुका

पाचोड ते पाथरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे;पहिल्याच पावसात पुलाला भगदाड

घनसावंगी शहरातील मुख्य पुलाला अशाप्रकारे भेगा पडलेल्या आहे.

images (60)
images (60)

संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट काम केल्याचे ग्रामस्थांचे आरोप, वरिष्ठ अधिकारी,व लोकप्रतिनिधी यांचेही कामाकडे दुर्लक्ष

कु़ंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

पाचोड ते पाथरी या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे.सदरील काम हे गुजरात येथील एका युनायटेड कंपनीकडून करण्यात येत आहे.परंतू पहिल्याच पावसात या रस्त्यांची वाट लागलेली आहे.काही ठिकाणी रस्ता खचला असून त्यात पाणी साचत आहे.तर घनसावंगी येथील एका पुलाला भेगा पडल्या आहेत.तर दुसरा पुल पावसाने वाहून गेला आहे.जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या तालुक्यात संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याचे काम हे थातूरमातूर करून डल्ला मारला असल्याचे दिसत आहे. लोकप्रतिनिधी सह वरीष्ठ अधिकाऱ्यांचे देखील या कामाकडे लक्ष नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट व बोगस दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थ, वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

पाचोड, अंबड, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव,आष्टी,पाथरी,या रस्त्यांच्या कामाला वर्ष उलटले आहे. तरीदेखील रस्त्याचे काम अपूर्णच आहे.मागील वर्षभरापासून हे काम संथगतीने सुरू असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.या पुलाला मोठा भगदाड पडल्याने वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याची काम संपण्याची कालावधी जवळ आली असल्याने कंत्राटदार हे थातूरमातूर काम करत असल्याचे दिसून येते. दरम्यान घनसावंगी शहरातील महावितरण जवळील पुल वाहून गेला आहे.त्यामुळे सोमवारी सात ते आठ वाहतूक विस्कळित झाली होती.त्यानंतर या ठिकाणी मुरूम टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला.शहरातील मुख्य पुलाला भेगा पडल्या आहे.त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.संबधित कामाची गुणवत्ता यंत्रणेकडुन चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!