राजुरकर कोठा येथे विद्युत तार तुटली
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील राजुरकर कोठा येथील विद्युत खांबावरील विजेच्या तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत.बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तार तुटून खाली पडली होती.रस्त्यावर कुणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.शिवाय गावातील तारा जीर्ण झाल्याने वारंवार तुटून पडत आहे.या वीज तारा बदलून घेण्याची मागणी नागरिकांनी वारंवार महावितरणाकडे केली.परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.बुधवारी कुंभार पिंपळगाव परीसरात वादळी वारे वाहत होते.यावेळीच तार तुटून पडली.रस्त्यावर कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.यामुळे ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली.याकडे महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नवीन विज तार टाकावीत, अशी मागणी चंद्रकांत बहिर, मच्छिंद्र बहिर, सखाराम दुबाले, संतोष बहिर,वचिष्ट बहिर, योगेश वैद्य, सोमनाथ सोनमाळे, गणेश बहिर,नारायण बहिर, किशोर पोकळे, भास्कर तांबे,भारत बहिर, रामकिसन खोले यांनी केली आहे.