घनसावंगी तालुका

राजकिय दबावतंत्र :राजा टाकळी केंद्राची चक्क रुग्णवाहिका च पळवली!

जिल्हा परिषद उपाध्यक्षानीच रुग्णवाहिका पळवली ?आरोग्य मंत्र्यांच्या कामाला गालबोट!

ग्रामस्थांचा रोष वाढला : रुग्णवाहिका शोधून काढा!

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर

घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी आरोग्य केंद्राला मिळालेली रुग्णवाहिका राजकिय दबावतंत्र वापरून पळवली असुन यामुळे ग्रामस्थांचा रोष वाढला आहे तर रुग्णवाहिका तात्काळ शोधून देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री(वित्त) यांनी मार्च च्या अर्थसंकल्पिय भाषणात केलेल्या घोषणे प्रमाणे आरोग्य संस्थाच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून 500 नव्या रुग्णवाहिका देण्याचे सांगितले होते त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी 20 रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत पैकीच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 10 रुग्णवाहिका व ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा, स्त्री रुग्णालय,मिळून 5 रुग्णवाहिका वितरीत करण्यात आल्या आहेत तसेच 5 मे रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी वितरण आदेशात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व रूग्णालयांना रुग्णवाहिका वाढवून देण्याबाबत मौखिक सुचना केल्या आहेत,जिल्ह्यातील वितरित रुग्णवाहिका पैकी एक रुग्णवाहिका राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळाली होती ही रुग्णवाहिका शासनाच्या आदेशानुसार नावासाहित जालना येथे दाखल झाली.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी सूचना देखील देण्यात आल्या होत्या मात्र राजकिय दबावतंत्र वापरून जिल्हापरिषदेने हिच रुग्णवाहिका तिर्थपुरी येथे पळवल्याची चर्चा शोशलमीडियावर सुरू आहे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे यामुळे ग्रामस्थांतुन रोष निर्माण झाला असुन आमच्या हक्काची रुग्णवाहिका मिळालीच पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांतुन
होत आहे.
तसेच राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दोन उपकेंद्र येत असुन 11 गावातील 18 ते 19 हजार लोकसंख्येला या केंद्रातून सुविधा मिळते आहे यामध्ये राजाटाकळी,गुंज बु.,भादली, सिसरवाडी, नाथनगर,नागोबाची वाडी, शिवनगाव, उक्कडगाव,गणेशनगर, राजूरकर कोठा, अंतरवाला असे 11 गावात सुविधा देण्यात येत असल्याने सद्यस्थितीत असलेली रुग्णवाहिका ही पूर्णपणे नादुरुस्त असुन त्यामध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत यामुळे नवीन रुग्णवाहिका मिळाल्याच्या बातमी ने परिसरातील ग्रामस्थांना एक दिलासा मिळाला होता मात्र रुग्णवाहिका च दुसरीकडे पळविल्याने ग्रामस्थांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधी कडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत यामुळे आरोग्य विभाग व पालकमंत्री यांनी याबाबत सविस्तर चौकशी करून राजाटाकळी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका लवकरात लवकर शोधून द्यावी अशी मागणी होत आहे


जिल्हा परिषद उपाध्यक्षानीच रुग्णवाहिका पळवली ?आरोग्य मंत्र्यांच्या कामाला गालबोट!

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी कोरोना महामारीच्या काळात अतिशय कौतुकास्पद कार्य केले असुन देशभरात त्यांचे कौतुक केले जाते आहे मात्र जालना जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी राजकीय दबाव तंत्र वापरून राजाटाकळी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका पळवली असून आरोग्य मंत्र्यांच्या कामाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप रोजगार हमी योजनेचे ता.अध्यक्ष रविंद्र आर्दड,माजी आरोग्य व शिक्षण सभापती रघुनाथ तौर,गणेशदादा आर्दड,सरपंच डिगाबर आर्दड,बापूसाहेब आर्दड,विष्णु आर्दड,उद्धवराव आर्दड यांनी केला असुन याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता काहीही प्रतिसाद मिळत नाही यामुळे जिल्हा जिल्हाधिकारी साहेब व राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश भैय्या टोपे साहेबांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून राजाटाकळी आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!