जालना जिल्हा

उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचा जालना जिल्हा दौरा

बबनराव वाघ / उपसंपादक

images (60)
images (60)
  जालना :-   महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री  डॉ. नितीन राऊत यांचा दि.12 जुन 2021 शनिवार रोजी जालना जिल्हा दौ-यावर येणार असुन, नियोजीत कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. सकाळी 11.30 वाजता परभणी येथुन जालनाकडे प्रयाण करतील, दुपारी 12.45 वाजता जालना येथे आगमन होणार व गांधी चमन चौकातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पन करतील यानंतर दुपारी 1.00 ते 1.30 जालना विश्रामगृह येथे जातील, दुपारी 1.30 ते 2.30 जालना जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यकर्ते व अनुसुचित जाती विभाग काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांन समवेत संवाद साधतील, स्थळ -जालना विश्रामगृह, दुपारी 2.45 वाजता पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करतील, स्थळ – जालना विश्रामगृह, दुपारी 3.00 वाजता जालना येथुन उटवदकडे प्रयाण, दुपारी 3.30 वाजता उटवद येथे आगमन व महापारेषण मार्फत  बसविण्यात येणा-या 132 के.व्ही. उपकेंद्राचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. 
यानंतर दुपारी 4.00 वाजता उटवद येथुन तीर्थपुरीकडे प्रयाण करणार व दुपारी 5.00 वाजता तीर्थपुरी येथे महापारेषण मार्फत बसविण्यात येणा-या 132 के.व्ही. उपकेंद्राचे भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती लावून दुपारी 5.30 वाजता तीर्थपुरी येथुन औरंगाबादकडे शासकीय वाहनाने प्रयाण करणाऱ आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!