पञकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्या वाळू माफीयांवर कडक कारवाई करा- राज्य पञकार संघाची मागणी
परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधिक्षकांना निवेदन
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
जाफ्राबाद येथील दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफीयांनी केलेल्या झालेल्या भ्याड हल्लाचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्फत पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि ११/०६/२०२१ रोजी जाफराबाद येथील पंचायत समिती कार्यालय समोर दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर वामनराव पाबळे यांच्यावर वाळु माफीयांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जिवघेण्या हल्ला करण्यात आला आहे. तसेच वाळुच्या बातम्या का छापतो म्हणून जबर मारहाण केल्याने ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह इतर जण मारहाणीत जखमी झाले आहेत. जखमीवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. पत्रकार ज्ञांनेश्वर पाबळे यांच्यावर औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. समाजहितासाठी पत्रकारांनी अवैध वाळु उत्खनन बाबत आपल्या दैनिकात बातमी प्रकाशित केल्यामुळे याचा इतर पत्रकारांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत असून वाळु चोरीचा सर्रास प्रकार सुरु आहे. अशा अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या विरोधात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाचा निषेध व्यक्त करत पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत संबंधीत वाळू माफियावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी परतूर पत्रकाराच्या वतीने करीत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या निवेदनावर राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे. सचिव दीपक हिवाळे, एम.एल. कुरेशी, अजय देसाई, राजकुमार भारुका, भारत सवने, आशीष धुमाळ, मुन्ना चितोडा, रामप्रसाद नवल, अशोक साकळकर,राहुल मुजमुले, सरफराज नाईकवाडी, माणिक जैस्वाल, प्रभाकर प्रधान, सागर काजळे, कैलास चव्हाण, कैलास सोळंके, आशीष गारकर, इम्रान कुरेशी, शेख अथर, संजय देशमाने, गणेश लालझरे, यांच्यासह आदि पत्रकार उपस्थित होते.