घनसावंगी तालुका

जिल्हा परिषद शिक्षक झाला पोलीस उपनिरीक्षक : केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षकांकडून सत्कार.

घनसावंगी तालुक्यातील गुंज बु. केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


शिक्षण क्षेत्र सोडले तरी माझ्यातला शिक्षक कायम राहील : पी एस आय एडवळे.

images (60)
images (60)

घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे मनोगत व्यक्त करतांना

शिक्षण क्षेत्रात काम करत असतांना मी माझ्यातला शिक्षक कायम जागरूक ठेवून विद्यार्थी घडवण्याचे काम केले असुन यापुढेही शिक्षण क्षेत्र सोडले असले तरी जिथे कुठे माझी पोस्टिंग होईल तेथील शाळेवर भेट देऊन मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करून माझ्यातला शिक्षक कायम ठेवण्याचे काम मी करेल असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले ज्ञानेश्वर एडवळे यांनी जिल्हा परिषद शाळा राजाटाकळी येथे गुरुवारी (ता.१७) सत्कार सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख बा ना सोळंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य शिवनगाव किरण मोरे,केंद्रीय मुख्याध्यापक प्रमोद येडले,मुख्याध्यापक श्रीकृष्ण तौर,रोहिमल,पत्रकार नितिन तौर,व्यावसायिक यशवंत मुळे हे उपस्थित होते.
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथील जिल्ह्या परिषद शाळेतील दोन शिक्षक ज्ञानदानाचे काम करत असतांनाच राज्यसेवा परीक्षेची तयारी करत होते त्यापैकी एक शिक्षक आदिनाथ ढाकणे यांची गतवर्षी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली असून ते आज जालना जिल्ह्यातील अंबड येथिल पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत तसेच दुसरे पोलीस उपनिरीक्षक म्हणून ज्ञानेश्वर एडवळे यांची निवड झाली असून ते 24 जून रोजी नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी जात असल्याने त्यांना गुंज बु. केंद्रातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब धांडे,अशोक काकडे,अमर तौर,गोवर्धन खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बुद्रुकवाड यांनी केले तर आभार आप्पासाहेब तौर यांनी मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!