कोरोना अपडेटदेश विदेश न्यूज

कोरोनाच्या तिस-या लाटेपासून भारताला अत्यंत कमी धोका.

लसीकरण कोरोना विरुद्धच्या लढ्यातलं सर्वात प्रभावी हत्यार असल्यानं सगळेच देश लसीकरण मोहिमेला गती देत आहेत. देशातील २० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झाल्यास तिथे कोरोनाची लाट येत नसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे.

images (60)
images (60)

अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्ससारख्या देशांमध्ये २० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिथे कोरोनाची लाट आली नाही. या देशांशी तुलना केल्यास भारतानं नुकताच एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. देशातील २५.९८ कोटी (२०.९५ टक्के) नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

यातील ५.५२ कोटी (४.४५ टक्के) नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. ७० टक्के लोकसंख्येला किमान एक डोस दिला गेल्यास तिसऱ्या लाटेचा झोका टाळता येऊ शकेल. मात्र डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव पाहता अनेक तज्ज्ञ ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवत आहेत.

देशात आतापर्यंत ३१ कोटींहून अधिक डोसचा वापर झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ६५ कोटी डोस तयार होतील. म्हणजेच ऑक्टोबरच्या आधी ९६ कोटी डोस वापरले जातील. देशातील १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ८५ कोटी आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!