जालन्यासाठी 3 महिन्यात 3 योजना, जालना सुधरतेयं.
विकासाचा वनवे, रावसाहेब पाटील दानवे
दिल्ली | 20 सप्टेंबर 2022
भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना लोकसभा क्षेत्रात आनलेल्या नवनविन प्रकल्पांमुळे तसेच पायाभूत सुविधांच्या पूर्ततेमुळे मराठवाड्याच्या “विकासाचा वनवे, रावसाहेब दानवे” असे म्हणायला हरकत नाही.
जालना येथे मल्टी- मॉडल लॉजिस्टीक पार्क (MMLPs) डेव्हलप केला जाणार असुन भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत देशभरात 35 महत्त्वाच्या ठिकाणी मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क्स (MMLPs) विकसित केला जाणार आहे. यामध्ये जालन्याचा समावेश करण्यात आला असून या प्रकल्पाची किंमत 450 कोटी रुपये आहे. याद्वारे नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) आणि जेएनपीटी यांच्यामध्ये एक करार केला जाणार असून. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. सर्वानंद सोनोवाल, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत 21 सप्टेंबर 2022 बुधवारी होणार आहे.
हा करार झाल्यानंतर जालना परिसराचा औद्योगिक विकास होवो. औद्योगिक कनेक्टीव्हिटीसाठी जालना ओळखले जाईल, यामुळे स्थानिक लोकांना रोजगार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. हा प्रकल्प ड्रायपोर्ट मधिल 182 हेक्टर मध्ये होणार असुन, डिसेंबर 2022 पर्यंत ड्रायपोर्ट सुरु केला जाणार आहे.
NHLML आणि जेएनपीटी मध्ये होणारा करार हा नागपूर करारासारखाच असणार आहे.