मिलिंद साळवे यांना मदत फाउंडेशन तर्फे 31 हजार रुपयाची मदत
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील मदत फाउंडेशन हे तालुक्यातील गरजावंतांना नेहमीच मदत करण्यासाठी तत्पर असुन दि.४जुलै रोजी भायडी येथिल एका गरीब कुटुबाला ३१ हजाराची मदत या मदत फाउंडेशनकडुन करण्यात आली.
मिलिंद साळवे रा .भायडी ता. भोकरदन सदरील युवक मागील पाच वर्षांपासून एक्सीडेंट मुळे एकाच ठिकाणी पडलेला होता आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि घरामध्ये फक्त म्हातारी आई आणि वडील त्याचा संभाल करत होते दुसरा कमावणारा कोणी बायको, भाउ कोणीच नसल्यामुळे, त्याला दवाखान्यात न्या जायला पैसे सुद्धा नव्हते.त्याचा मांडीपासून खालील पाय संपूर्ण सडलेला होता आणि त्याच्या पायातील रॉड चे खिळे बाहेर आले होते. आणि त्याला मदतीची अत्यंत आवश्यकता होती तरी ही गोष्ट गावातील प्रतिष्ठित मंडळींनी मदत फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील पडोळ यांच्या कानावर टाकली आणि दिनेश पाटील पडोळ यांच्या मदत फाऊंडेशनने सर्व मित्र परिवारांना सोशल मिडियाव्दारे आव्हान केले की आपल्या परीने जी मदत शक्य होईल ती मदत करावी आणि त्या अवाहानाला प्रतिसाद देत तब्बल 31000 रुपये मदत जमा झाली.
आज दि.४ जुलै रोजी जमा झालेली मदत त्याच्या आई वडील यांना मदतफाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पाटील पडोळ व राजेश पाटील साबळे,अमोल जाधव,विशाल पोटे,अर्जुन ठाले, सुरेश पाटील शेळके,कल्याण दसपुते व गावातील सुभाष सर जंजाळ, विष्णुपंत जंजाळ, नितीन दसपुते, बबन जंजाळ, महेश दसपुते, व सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांच्या समक्षसुपुर्त करण्यात आली.तसेच मदत फाउंडेशन तर्फे मदत करणाऱ्या सर्वमित्र परिवाराचे वभायड़ी गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले.