जालना जिल्हा

मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेंतर्गत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न.

विधानसभा निहाय रिसीडयुअल मतदारांची यादीची सी.डी. देण्यात आली

जालना दि.8- भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार यादी शुद्धीकरण मोहिम राबविण्यात येत असून याअंतर्गत मतदार यादीत नाव आहे मात्र ज्या मतदाराचे फोटो नसेल अशा मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे फोटो जमा करावेत. जे मतदार फोटो जमा करणार नाहीत अशांची नावे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वगळली जातील असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ ज्ञानोबा बानापुरे यांनी सांगितले आहे.

images (60)
images (60)

दि.७ जुलै रोजी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेंतर्गत आयोजित राजकीय पक्षांच्या सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी नायब तहसीलदार डी.ई.गाडेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते,बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, शिवसेना पक्षाचे प्रतिनिधी दिपक रणनवरे या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. बाणापुरे म्हणाले की, जिल्हातील एकुण १६३३ मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागात मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो जमा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तरी सुद्धा राजकीय पक्षांच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो प्रमाण वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे डॉ बाणापुरे शेवटी म्हणाले.

या वेळी राजकीय पक्ष प्रतिनिधी यांना जालना जिल्ह्यातील विधानसभा निहाय रिसीडयुअल मतदारांची यादीची सी.डी. देण्यात आली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!