जालना जिल्ह्यातील तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या.
न्यूज जालना :
जालना जिल्ह्यातील तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीचे आदेश दि २१ जुलै बुधवारी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी काढले आहे यात
आष्टी, सेवली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सुध्दा बदली करण्यात आले आहेत दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांची आष्टी पोलिस ठाण्यात बदली.
आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांची जिल्हा वाहतूक शाखेत बदली. पोलीस हवालदार टी.सी. राठोड सुसाईड नोट प्रकरणात सेवली पोलीस ठाण्याच्या सपोनि. मंजुषा सानप यांना पोलीस नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आलेले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या सेवली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदनापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एन. उबाळे यांची बदली करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी आज बदल्यांचे आदेश काढून बदल्या झालेले अधिकारी यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.