परतूर तालुका

वडारवाडी व नागसेन नगर येथील पाणी व लाईटची व्यवस्था स्वखर्चातून करणार – मोहन अग्रवाल

शिवसंपर्क अभियान दरम्यान दिला शब्द

images (60)
images (60)

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसंपर्क अभियान दि. १२ जुलै ते २४ जुलै दरम्यान राबविण्यात येत असून परतूर शहरातील वडारवाडी व नागसेन नगर येथे शिवसंपर्क अभियान अंतर्गत परिसरातील नागरिकांशी बैठकीद्वारे संवाद साधण्यात आला. शहरातील वडारवाडी व नागसेन नगरच्या नागरिका सोबत शिवसेना नेत्यांनी बैठकीद्वारे संवाद साधला . यामध्ये परतूर शहरातील वडारवाडी व नागसेननगर येथील नागरिक गेले तीस ते चाळीस वर्षा पासून लाईट व पाण्यापासून वंचीत आहेत. पिण्याचे पाणी दूरवरून डोक्यावर घेऊन यावे लागते. या भागातील नागरिकांनी समस्याचा पाढा यावेळी वाचला असता या भागात दुर्लक्षित असलेल्या पाणी व लाईटची व्यवस्था स्वखर्चातून करणार असे परतूर नगरपालिका गटनेते तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख मोहन अग्रवाल यांनी जाहीर केले. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आव्हानही केले. या आव्हानास येथील नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबाजी तेलगड, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग,युवासेना शहर प्रमुख राहुल कदम, दलित आघाडी तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव , उपशहरप्रमुख दिपक हिवाळे ,आबासाहेब कदम ,भगवान घोडे ,लखन हिवाळे, यांच्यासह वडारवाडी व नागसेननगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!