जालना क्राईम

किरकोळ कारणावरून आभोंडा कदम गावात मारहाण

मंठा /रमेश देशपांडे

images (60)
images (60)

मंठा तालुक्यातील आभोंडा कदम गावांतील किराणा दुकानदारास किरकोळ कारणावरून मारहाण करून किराणा दुकानाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी घडली ह्यप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याविषयी सविस्तर वृत्त अशी की, फिर्यादी गोविंद सुंदरराव बोराडे ता.02 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:00 वां.गावातील किराणा दुकान उघडली असता या वेळी आरोपी 1) बाळू तुकाराम चव्हाण 2) दशरथ रेवा चव्हाण रा.अभोडा कदम हे दोघे दुकानावर आले.05 किलो सोयाबीन तेलाची कॅन व एक किलो पोहा पुडा मागितला.सामान काढत असताना सामानाचे पैसे देणार नाही असे दोन्ही चव्हाण यांनी सांगून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोविंद बोराडे यांचा भाऊ बालासाहेब सुंदरराव बोराडे यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता दोघा बोराडे भावाना शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

तसेच गोविंद बोराडे यांच्या हातातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली व किराणा दुकानातील गल्यातील 5000 काढून घेऊन दुकानाची तोडफोड केली. व चावा घेऊन दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून मंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस सहाय्यक निबंधक शिंदे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!