जालना जिल्हा

नोंदणीकृत ऑनलाईन लिव्ह ॲण्ड  लायसन्सचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा

          जालना दि.5-  सध्या बऱ्याच शासकीय कार्यालयात तसेच खाजगी कामासाठी ऑनलाईन लिव्ह ॲण्ड लायसन्सचा वापर केला जातो. नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ऑनलाईन लिव्ह ॲण्ड लायसन्स पध्दतीने दुय्यम निबंधक कार्यालयास न येता ASP (Authorised sevice providers ) मार्फत किंवा वैयक्तिसुध्दा घरी बसून केला जातो व त्याला दुय्यम निंबधक कार्यालयकडून नोंदणी क्रमांक दिला जावून अधिकृत दस्त म्हणून कायदाप्रमाणे उपयोग केला जातो.

images (60)
images (60)

            ऑन लाईन लिव्ह ॲण्ड लायसन्स  या सर्व्हिसेस साठी  नोंदणी व मुंद्राक विभागाची website-http://igrmaharashtra.gov.in तर E-services- online service  यामध्ये E-Registration मध्ये जावून सर्व प्रथम E-Registration सेवा –नवीन नोंदणी- मालमत्तेची माहिती-भाडेकरु व मालकाची माहिती-ओळखदार व मालकाची माहिती- भाडे कालावधी- मुंद्राक व नोंदणी फी  भरणा-छायचित्र व अंगठा-आधार पडताळणी इ. माहिती भरुन संबंधीत दुय्यम निबंधक कार्यालयाकडे आपलोड केल्यास टोकन नंबर तयार होऊन त्याला संबंधित दुय्यम निबंधक यांच्याकडे मान्यता देवून नोंदणी करण्यात येतो व संबंधीतांना सदर दस्त नोंदणी झाल्याबाबतची प्रिंट काढून वापरता येतो.

            महाराष्ट्रात काही ठिकाणी दुय्यक निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत ऑनलाईन लिव्ह ॲण्ड लायसन्स दस्ताच्या प्रती काही अज्ञात व्यक्तीने बनावट व चुकीच्या पध्दतीने तयार करुन ती ऑनलाईन नोंदणीकृत झालयाचे भासवून  पक्षकरांना पुरविल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने ऑनलाईन नोंदणीकृत झालेल्या लिव्ह ॲण्ड लायसन्च्या दस्ताची  पडताळणी करण्यासाठी नोंदणी व मुंद्राक विभागाची  बेवसाईड http://igrmaharashtra.gov.in या वर जावून E-services मध्ये  विना शुल्क सेवामध्ये दस्तनिहाय दस्त नंबर टाकून  दुय्यम निबंधक कार्यालयाने दस्त क्रमांक टाकून सदर दस्ताची नोंद खरोखर झाली आहे किंवा कसे यांची पडताळणी करता येते याबाबत परिवहन विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महसुल विभाग, नगर पलिका, नगर पंचायत व जिल्हा आग्रमी बँक यांच्या  बैठका मुद्रांक जिल्हाधिकारी जालना यांनी दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी  तसेच  नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक औरंगाबादचे  श्री सोहम वायळ व मुद्रांक जिल्हाधिकारी दिपक सोनवणे यांनी दि.5 ऑगस्ट 2021 रोजी बैठक औरंगाबाद या ठिकाणी घेतली तसेच सह जिल्हा निबधंक वर्ग-1 औरंगाबाद यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते  व ऑनलाईन लिव्ह ॲण्ड लायसन्यची नोंदणी करणे व केलेल्या नोंदणीची पडताळणी करणे बाबची माहिती व प्रशिक्षण यावेळी देण्यात आले जास्तीत जासत नागरिकांनी प्रशासकीय कायालयाने ऑनलाईन लिव्ह ॲण्ड लायसन्चा सेवेचा फायदा घेण्याचे आवाहन  नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रण औरंगाबादचे सोहम वायळ यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!