जालना क्राईमभोकरदन तालुका

सागरच्या खुन प्रकरणातील योगेश फुकेला खुलताबाद येथुन अटक

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन शहरात दि.५ रोजी राञी झालेल्या सागर बदर खून प्रकरणातील आरोपीला भोकरदन पोलिसांनी आज दि.७ आॅगस्ट रोजी शनिवारी दुपारी 12 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे अटक करण्यात आले आहे.

दि.५ आॅगस्टच्या राञी १० वाजेच्या सुमारास खुन केलेल्या आरोपीचे नाव योगेश फुके असून त्याला पोलिसांचे पथक भोकरदनला घेवुन आले आहे . भोकरदन शहरातील 132 केव्ही केंद्राजवळ कैलास फुके व योगेश फुके भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सागर भारत बदर याच्या पोटात योगेश फुके याने चाकू खुपसून खून केला होता . तेव्हापासून तो फरार झाला होता . आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रत्नदीप जोगदंड , पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे , पोलिस कर्मचारी गणेश पायघन , रुस्तुम जैवळ , सागर देवकर हे दोन दिवसांपासून मागावर होते .

आरोपी सातत्याने जागा बदलत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण जात होते . मात्र , शेवटी शनिवारी सकाळी तो खुलताबाद येथे असल्याची माहिती मिळाली . पोलिसांच्या पथकाने टावर लोकेशनव्दारे मुख्य रोडवरील एका हाॅटेलमध्ये झडप मारून योगेशला पकडले . योगेश हा खुलताबाद येथून सुध्दा दुसरीकडे जाण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला भोकरदन पोलिस ठाण्यात आणन्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!