केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणासह विविध मागण्यांसाठी क्रांती दिनानिमित्त मार्क्सवादीचा तहसीलवर मोर्चा
घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर
घनसावंगी तालुक्यासह श्रमिक जनतेविरोधी धोरणे राबवणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात विविध मागण्यांसह तहसील कार्यालयासमोर निदर्शने व मोर्चा काढणार असुन शेतमजूर व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोविंद आर्दड यांनी केले आहे.
सद्यस्थितीत वाढती महागाई,शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात बँकांनी केलेली अक्षम्य दिरंगाई,न मिळालेला पीक विमा,निराधार वृद्धांना मिळणाऱ्या आर्थिक साहाय्य योजनांची नीट होत नसलेली अंमलबजावणी,रेशनिगचे प्रश्न,अंगणवाडी,आशा,ग्रामपंचायत संगणक परिचालक व शालेय आहार कामगार इत्यादी योजना कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन आणि किमान वेतनाचा प्रश्न,रोहयो योजनेतील कामामध्ये होणार भ्रष्टाचार,दिरंगाई आणि बांधकाम मजुरांच्या घरकुल योजनेची होत नसलेली अंमलबजावणी इत्यादी मागण्यासाठी तसेंच मोदी सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात उद्या ९ ऑगस्ट सोमवार रोजी क्रांती दिनानिमित्त घनसावंगी तहसिल कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,किसान सभा,सिटू आणि शेतमजूर युनियन(लाल बावटा) च्या वतीने सरकार च्या विरोधात निदर्शने व मोर्चाचे आयोजन केले आहे असून झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकार ला जागे करण्यासाठी असंख्य तालुक्यातील शेतकरी,कामगार,व शेतमजुरांच्या उपस्थितीत मोर्चा काढणार असल्याचे कॉम्रेड गोविंद आर्दड यांनी सांगितले.