Breaking News
जालना जिल्हा

उत्पादक शेतकऱ्यांचा सरसगट कापूस खरेदी करण्याची मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना न्यूज :-

उत्पादक शेतकऱ्यांचा सरसगट कापूस खरेदी करण्यात यावा, कारण या वर्षी कोरोना व वादळ वाऱ्यासह गारपीट पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत असतानाच, कापूस विक्रीचे संकट समोर उभा आहे, अशातच सी सी आय कापूस खरेदी केंद्रावर एफएक्यू दर्जाचा कापूस मालाची खरेदी होणार असे, जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, अशा वेळी राज्य सरकारने तज्ञान सोबत चर्चा करून, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस सरसगट खरेदी करणे बाबत, जिल्हा उपनिबंधक जालना यांना आदेश द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री याना केलेल्या पत्रात केली आहे.कारण जालना जिल्ह्यात अंदाजे जवळपास ७ ते ८ लाख क्विंटल कापूस, विक्रियल अभावी पडून आहे, अशावेळी सीसीआय ची एफएक्यु हि जाचक अटी शितील करून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरसगट दोन प्रतीचे नियम लावून कापसाची खरेदी करण्यात येईल असे जाहीर करून, या मुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कारण मराठवाडातील नैसर्गिक आपत्ती, व परिस्थिती पाहतात अनेक वर्षे कोरडा दुष्काळ होता, परत या वर्षी ४ वेळा वादळवाऱ्यात गारपीट पाऊस झाल्यामुळे इतर पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे या मध्येच कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीला तोंड देत असताना कापूस घरी पडून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली असून, आज एमर्जेंसी लागून लोकडॉनला ३१ दिवस झाले, या ३१ दिवसात कापसाचे अंदाजे वीस टक्के वजन घट झाली असेल, कारण कापसाचे वजन उन्हाळ्यामध्ये घटण्याचे प्रमाण वाढत असते या ३१ दिवस नक्कीच वजन घटले असेल यामुळे शेतकर्‍यांचे आधीच नुकसान झालेली आहे,याचा अनुभव सगळ्याच राज्यकर्त्यांना सुद्धा आहे, करण कापूस ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हा कापुस शेतात पिकवलेला आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस निर्मितीसाठी काही कारखाने नाहीत, जो काय कापूस मला त्यांच्याकडे आहे तो शेतीत कष्ट करूनच माल उत्पादित केलेला आहे.
जिल्ह्यातील जिल्ह्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा कापुस सरसगट व एफएक्यु अट शिथिल करून खरेदी करण्या बाबत, जिल्हा उपनिबंधक जालना यांना तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक