घनसावंगी तालुका
शाँर्टशर्किमुळे साडेतीन एकर ऊस जळुन खाक..
शाँर्टशर्किमुळे साडेतीन एकर ऊस जळुन खाक..
नुकसान भरपाई देण्याची मागणी..
शाँर्टशर्किमुळे साडेतीन एकर ऊस जळुन खाक..
नुकसान भरपाई देण्याची मागणी..
तीर्थपुरी प्रतीनीधी
घनसावंगी तालुक्यातील दहिगव्हान येथिल शेतकरी दीपक नाईकवाडे यांच्या ऊसाला शाँर्टसर्किटमुळे साडेतीन एकर ऊस जळुन खाक झाल्याची घटना दि ३ आँक्टोबर रोजी घडली. यात त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले सदरील नुकसान भरपाई विज वितरण कंपनीने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि दहिगव्हान येथिल शेतकरी दिपक नाईकवाडे यांनी गट नंबर १४४ मध्ये ऊसाची लागवड केली होती दि ३ आँक्टोबर रोजी अचानक शाँर्ट सर्किटमुळे या ऊसाला आग लागून ऊस जळाला सदरील घटना ग्रामस्थांना कळाल्यानंतर त्यांनी ही आग विझवली यासाठी दिड तास वेळ लागला. यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे यामुळे विज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नाईकवाडे यांनी केली आहे.