तीर्थपुरीत ८६ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त !
नगर पंचायतकडून मोहीम..
तीर्थपुरी प्रतीनीधी
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी नगर पंचायतने सिंगल यूज प्लास्टिकबंदी अंमलबजावणी करिता मोहीम राबवत तीर्थपुरी बाजार पेठे मधून ८६ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले.
प्लास्टिक कचरा अधिनियम २०२१ अ नुसार दि. १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिक (एकल वापर प्लास्टिक ) चा वापर करण्यास शासनाने मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते त्या अनुषंगाने आज दि. ५ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांचे मार्गदर्शना खाली शहराअंतर्गत बाजारपेठे मध्ये व्यापारी व नागरिक यांना सिंगल युज प्लास्टिक वापर करू नये बाबत नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या. तसेच विविध व्यापारी प्रतिष्ठान मध्ये आढळून आलेले अंदाजे ८६ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी यांनी व्यापारी नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले. व यानंतर जे कोणी व्यापारी व नागरिक सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री करताना आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सदर मोहीम बी.के.मिसाळ न.पं. कार्यालय अधीक्षक यांचे नेतृत्वाखाली न. पं. कर्मचारी सोपान कडुकर, विकास साबळे, संतोष लवनाडे, आकाश नारळे, किशोर जाधव, राजेंद्र कडुकर, गणेश मोरे रामेश्वर कासार, ज्ञानेश्वर बोबडे, प्रभाकर पाटील, दत्ता मापारे, जितेंद्र गाडेकर, दत्तात्रय वाघ यांनी राबविली.