घनसावंगी तालुका
पोलीस ठाण्यासमोरच अवैध गुटखासह सुगंधी सुपारी यांची बिनबोभाट विक्री?
अवैध गुटखा व सुगंधी सुपारीची बिनबोभाट विक्री
जालना प्रतिनिधी:
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह घनसावगी तालुक्यात अवैध गुटखा व सुगंधी सुपारी ही पोलीस ठाण्याच्या अंतरावर मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने विकली जात असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांना अवैध धंदे बंद करण्यासाठी अनेक वेळा आदेश दिलेले असताना मात्र याकडे घनसावंगी पोलिसांचे अर्थपूर्ण संबध असल्याने कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे
घनसावंगी पोलिस निरीक्षक कारवाई करण्याची हिंमत करणार का ?
याबाबत घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुगंधी सुपारी ,गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याची हिंमत करतील का असा आशयाचे पत्र औरंगाबाद परिक्षेत्र विभागाचे पोलीस महासंचालय कार्यालय यांना दिले आहे.