जालना जिल्हा व सत्र न्यायालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
जालना दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जालना जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जालना तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात वरीष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती माधुरी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. रांजदेकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एल. टिकले, सहाय्यक अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता वाल्मिक घुगे आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉक्टरेट मिळाल्याबद्दल ॲड आनंद झा यांचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीस श्रीमती सुवर्णा केवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड राजेंद्र राऊत, सचिव ॲड शारजा शेख, ॲड अरविंद मुरमे आदींसह न्यायीक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा सरकारी अभियोक्ता दिपक कोल्हे, सुत्रसंचालन ॲड लक्ष्मण उढाण तर आभार प्रदर्शन ॲड आनंद झा यांनी केले.