मंठा तालुका
मंठा येथील केंद्रीय कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

मंठा /रमेश देशपांडे
शहरातील जिल्हा परिषदेची केंद्रीय कन्या शाळा येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री ए. टी. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून शाळेत ध्वजारोहण समारंभ पार पडला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी श्री कदीर शहा व श्री संतोष अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. समारंभ यशस्वीतेसाठी सर्वश्री भगवान जायभाये, काशिनाथ गोंडगे, मनोहर कुलकर्णी, गौतम वाव्हळ तसेच श्रीमती शांता क्षीरसागर, शकुंतला राखे, जयश्री थोरात, स्वाती जवळेकर, ताराबाई भिसे नाजेरा शेख यांनी परिश्रम घेतले.